You are currently viewing पु. ल. कला महोत्सवात रसिक दंगले

पु. ल. कला महोत्सवात रसिक दंगले

*पु. लंच्या बंगाल साहित्य आणि सांगीतीक कारकिर्दीचा सुरेल संगम*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित पु. ल. कला महोत्सव २०२३ च्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी ‘शोंगित शिल्पी पी. एल. बाबू (पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्य संगीतमय भावबंध)’ हा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमात रविंद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर यांनी उत्तम रचनांचं सादरीकरण केलं. तर ज्येष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. धनत्रयोदशीच्या दिवशी या कार्यकमाचं निरुपण करताना आपलं शब्दधन मुक्तकंठाने धनश्री लेले यांनी उधळलं. पु. ल. देशपांडे यांचे बंगाली भाषेशी असलेले नाते, त्यातून त्यांना भावलेले साहित्य, गाणी आणि त्यासंदर्भात असलेले अनेक रंजक, मजेदार आणि अनोखे किस्से ह्या कार्यक्रमातून उलगडण्यात आले. पु. लंच्या व्यक्तीमत्वातील बंगाली साहित्याचा हा अनोखा पदर रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पत्रसूचना विभागाच्या महासंचालिका मोनिदिपा मुखर्जी उपस्थित होत्या. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर यांच्या हस्ते मोनिदीपा मुखर्जी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अनेक भाग व्हायला हवे, इतकी सुंदर कलाकृती आपण सादर केलीत या शब्दात मोनिदिपा मुखर्जी यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले.

त्यानंतर ‘पु. ल. एक आनंदस्वर’ हा पु. ल. देशपांडे यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित सुरेल संध्याकाळ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडीलकर आणि वेदश्री ओक, डॉ. राम पंडित, स्नेहल जोगळेकर, साधना काकटकर त्यांच्या सहकलाकारांनी सादर केला. कार्यक्रमाचं समयसूचक निवेदन दिपाली केळकर यांनी केले. दोन्ही कार्यक्रमांसाठी श्रोतृवर्गाला आपल्या शब्दांमध्ये गुंतवून ठेवलं सूत्रसंचालन करणार्‍या मिनीषा किरण वालावलकर यांनी. या दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पु. ल. कला महोत्सव २०२३ मध्ये शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५ वाजाता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी ‘व्हायोलिनचे रंग-तरंग’ या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सूरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायं. ७ वाजता संस्कार भारती, कोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण ‘लोकरंग दिवाळी संध्या’ या कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत. पु. ल. कला महोत्सवामध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत.

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा