*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*दिवाळी— दीपावली*
दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक सण आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ रोषणाईचा सण किंवा दिपोत्सव असा आहे. संस्कृत मध्ये दिवाळी शब्दांस “दीपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो….दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, “आपो दीपो भवः”, म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रकाश रूप व्हा. सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात…
खरं तर दिवाळी म्हणजे जीवन उजळवून टाकणारा प्रकाश, दिवाळी म्हणजे दिव्यांची ओळ… अर्थात हा प्रकाश फक्त दिव्यांचाच नसतो तर कला, साहित्य, संस्कृतीचाही असतो. नाट्यगीत, चित्रपट गीत, संतांनी लिहिलेले अभंग असो वा कवींनी केलेल्या कविता या सर्वांमध्ये दिवाळीचे प्रतिबिंब आपल्याला दिसते दिसत असते. हा देखील एक प्रकारचा दिवाळीचाच उजळवून टाकणारा प्रकाश व दिवाळीचा स्वादिष्ट फराळचं नाही का… !!
पहाटेच्या वेळी ऐकू येणारी मंदिरातील काकड आरती असो की टाळ- मृदुंगाच्या तालावर म्हटलेली भजने असो.. ती ऐकली की दिवाळी फक्त दिव्यांच्या ओळीपुरती राहतचं नाही तर ती आपल्या मनात आपल्या जीवनात सुमधुर गाणं घेऊन येते..
ह्या सणांची सुरवात वसुबारसेपासून होते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली थोर संस्कृती सुद्धा सर्वांवर प्रेम करायला शिकविणारी..
म्हणूनच वसुबारस या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा…
धनत्रोयदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा नैवेद्याला ठेवला जाणारा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. याच दिवशी एक दिवा यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून या दिवशी त्या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे केली जाते..
नरक चतुर्दशी हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करून व देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी
नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची ( कुमारीकांची) मुक्तता केली तो हा दिवस दुष्टाचा नाश आणि मुक्ताचा आनंद हे या मागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे असे सांगतात.
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. या धनलक्ष्मीच्या पूजना बरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी हिची ही पूजा करतात.
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त.. या दिवशी अनेक नवे प्रकल्प, नवे संकल्प चालू केले जातात आणि करतात ही..
कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस..
अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय असते.. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो करत असतो आणि आनंदही लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी सुखद… दिपावलीच्या अनेक सुखद आठवणीं पुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात……..
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी –ठाणे@
9870451020
*संवाद मिडिया*
*गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..🏍️🏍️*
*Advt Link👇*
————————————————-
🏍️ *गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..* 🏍️
👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸
👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷
👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷
👉 *DESTINI PRIME – फक्त रु. 999/- डाऊनपेमेंटमध्ये..*💥
👉 अधिक एक्सचेंज बेनिफिट
👉 फ्लिपकार्ट बुकिंगवर ही कॅश डिस्काउंट 💷
👉 5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास…😇
👉 आजच खरेदी करा📝🏍️
👉 *नियम अटी लागू*
🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*
*📱9289922336 / 7666212339*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*