You are currently viewing पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

   महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरीता  ऑनलाईन प्रणालीव्दारे इच्छुक लाभार्थ्यांनी  8 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जे.एन.खरे यांनी केले आहे.

         राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22  पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

स्थानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 100 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2023-24 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक/ शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव : AH.MAHABMS (Google play स्टोअरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध). अर्ज करण्याचा कालावधी : 9 नोव्हेंबर  ते 8 डिसेंबर 2023, टोल फ्री क्रमांक : 1962 किंवा 1800-233-0418 यावर संपर्क साधावा.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.

▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸

*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*

*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*

*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*

*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*

*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *

*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*

*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*

*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*

*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.

*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*

*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा