You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी
अपघाताच्या रुग्णाला गोवा बांबोळे येथे नेण्यासाठी 108 रुग्णवाहीकेला फोन करा असे सांगितल्याच्या रागातून डाॅक्टर व वाॅर्डबाय यांच्याशी हुज्जत घालणाऱ्यांची समजूत काढण्यास गेलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयाचा सुरक्षारक्षक प्रशांत बाबुराव वाडकर (वय 34) राहणार सावंतवाडी – सालईवाडा याला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी साईराज सुभेदार रा. सावंतवाडी – भटवाडी याच्यासह अन्य एक अनोळखी इसम अशा दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहीती अशी की, साईराज सुभेदार व त्याच्या सोबत तीन ते चार लोक मळगाव येथे अपघात झालेल्या रुग्णाला घेऊन उपचाराकरिता मंगळवारी रात्री साडेदहा वाजता उपजिल्हा रुग्णालयात आले यावेळी ड्युटीवर डाॅ.भक्ती सावंत होत्या. त्यांनी सदर अपघात ग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचाराकरिता गोवा बांबुळी येथे न्यावे लागेल. त्यासाठी 108 रुग्णवाहीकेला फोन करा असे सांगितले त्याचा साईराज याला राग आला व त्याने डाॅक्टर भक्ती सावंत व वाॅर्डबाॅय गणपत नाईक यांच्याशी वादावादी घालण्यास सुरवात केली. यावेळी सुरक्षारक्षक वाडकर यांनी त्यांना रोखत त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र साईराज याने तु आम्हाला रोखणार कोण असे सांगून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली व तेथील पाण्याचे ग्लास उचलून वाडकर याच्या डोक्यावर मारली. यावेळी त्याच्या डोक्यातून रक्त आले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या एकाने वाडकर याला पाठीमागून पकडून दोन्ही हात पकडून ठेवले व साईराज याने समोरुन हाताच्या ठोशाने खांद्यावर जोराची मारहाण केली याता वाडकर याचा खांदा निखळून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान या प्रकारानंतर संबधीत वाडकर व अन्य त्याच्यासोबत असलेल्यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान सुरक्षारक्षक वाडकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून साईराज सुभेदार व हात पकडून ठेवणारा अन्य अनोळखी इसम असा दोघांवर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकारानंतर सुरक्षारक्षक संघटना तसेच रुग्णालयातील डाॅक्टर कर्मचारी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधितावर कडक कारवाई करा तसेच तात्काळ अटक करा अशी मागणी केली. यावेळी सुरक्षारक्षक संघटनेचे अध्यक्ष विद्याधर रेडकर, सूर्यकांत आडेलकर, शिवाची सावंत, महेश बावकर,सर्वेश घाडी, संचिता नेरुळकर, जागृती इंगळे, विजय गुरव, जगन्नाथ केळुसकर, अमित सावंत आधी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा