मोटार रॅलीमध्ये सर्व पक्षिय नेत्यांचा मोठा सहभाग..
सावंतवाडी :
मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही… “एक मराठा लाख मराठा”… “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं”… अशी जोरदार घोषणाबाजी करीत आज येथील मराठा समाजाने सावंतवाडी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी राजवाडा येथून निघालेला शिस्तबद्ध मोर्चा शहरातून फिरून थेट तहसीलदार कार्यालयावर दाखल झाला. यावेळी आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवा अशा मागणीचे निवेदन यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोटार रॅली काढून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिमा घेऊन शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम राजे भोसले यांनी केले. त्यांच्या हस्ते शहरातील बापूसाहेब महाराज व शिवराम राजे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये सर्व पक्षिय नेत्यांनी मोठा सहभाग दर्शविला होता. यात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेसचे जेष्ठ नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादी पार्टीच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्ष अर्चना परब, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अपर्णा कोठावळे, मनसेचे माजी युवक जिल्हाध्यक्ष, सुधीर राऊळ, पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, रमेश गावकर, जितू गावकर, गुणाजी गावडे, भारती मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. काही झाले तरी आरक्षण मिळाले पाहिजे इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांचे उपस्थितांच्या माध्यमातून आभार मानण्यात आले. या लढ्यात त्यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत, असाही आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी सतीश बागवे, भूषण सावंत, उमेश गावकर, जयप्रकाश सावंत, किशोर वारंग, मुकेश ठाकूर, भानू परब, विलास जाधव, नरेंद्र कविटकर, सुरेश कविटकर, मिलिंद म्हापसेकर, दयानंद परब, अमित गावकर, लवू राणे, शिवराम मुळीक, सचिदानंद ठाकूर, संतोष ठाकूर, अशितोष धुरी, शिवाजी परब, नारायण राणे, महेंद्र वारंग, सदानंद गावकर, आदर्श गावकर, बाळकृष्ण पेडणेकर, दीपक भानसे, विश्वनाथ आंगरेकर, उदय भोसले, संजय राऊत, अमेय गावडे, रोहन परब, सुरेश गवस, रमेश गावकर, सत्यप्रकाश गावडे, अपर्णा कोठावळे सुधीर मल्हार, विलास सावंत, संदीप सावंत, बाळू सावंत, सूर्या पालव, नितीन राऊत, विनोद गावकर, अभिलाष देसाई ,मंगेश बिले, विनायक सावंत, मनोज घाटकर, दीपक शिर्के, आत्माराम गावकर, रवींद्र गावकर,विशाल सावंत, शिवदत्त घोगळे , धोंडी दळवी,नारायण जाधव, विनायक दळवी, सोनु दळवी, आकाश मिसाळ, भूषण सावंत, उमेश गावकर, राघोजी सावंत, जयप्रकाश सावंत, राजेंद्र म्हापसेकर, चंद्रोजी सावंत, खेमराज कुडतरकर, चंद्रकांत राणे, अभिजीत सावंत, प्रल्हाद तावडे, आनंद गवस, नंदू विचारे, प्रसाद राऊळ, रवींद्र गावकर , दीपक गावकर, साक्षी कुडतरकर,सौ संयुक्ता गावडे, भारती मोरे, अपर्णा कोठावळे, दिपाली सावंत, सुचिता गावडे, नीलिमा चलवाडी , सुरेश सावंत, संदीप राणे, पूजा दळवी, सुचिता गावडे, सुर्या पालव, विनोद गावकर, अभिजीत टिळवे अश्या मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.