दोडामार्ग
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात काँग्रेसच्या आमदार हुसनबानू खलिफे मॅडम यांच्या आमदार निधी मधून देण्यात आलेल्या निधी मधून मास्क, थर्मल गन, ppe किट, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर इत्यादी वस्तू दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. ज्ञानेश्वर अहिवळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा चिटणीस सुभाष दळवी,बाळा धाऊसकर, शहर अध्यक्ष सुधीर गवस, घनश्याम कर्पे, सुमन मणेरीकर, सुधीर चांदेलकर, देवानंद हजारे, गजानन वाडकर, सालू डिसोझा, विनायक पांगम, अजय नाईक, बाबू गवस, आनंद नाईक, निलकंठ सावंत, किशोर लोंढे, अंकुश गवस, सुनिल सावंत, आबा लोंढे, महादेव लोंढे, विश्वनाथ गवाळकर, राजन साळकर, राजेश्वर नाईक, दिगंबर लोंढे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.