You are currently viewing सख्ख्या भावाने डोक्यात हंडा मारल्याने किंजवडेत एक गंभीर

सख्ख्या भावाने डोक्यात हंडा मारल्याने किंजवडेत एक गंभीर

सख्ख्या भावाने डोक्यात हंडा मारल्याने किंजवडेत एक गंभीर…

देवगड

घरातील सामान नेत असल्याच्या रागातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यात हंडा मारून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार किंजवडे येथे घडला. किशोर कांबळी असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रवींद्र कांबळी व अन्य अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, किंजवडे खालचीवाडी येथील रवींद्र मोहन कांबळी(४०) हे नोकरी व्यवसाया निमित्त वैभववाडी येथे भाड्याने राहत असून घरातील भांडी व इतर साहीत्य नेण्यासाठी ते घरी किंजवडे येथे रविवारी आले होते. त्यांच्यासमवेत असलेल्या सहकाऱ्यांसमवेत ते घरातील भांडी व साहित्य घेवून जात असताना त्यांचा सख्खा भाऊ किशोर मोहन कांबळी(४५) यांनी त्यांना सर्वच भांडी घेवून जावू नकोस, थोडी भांडी मला पण ठेव असे सांगितले. याचा राग आल्याने रवींद्र यांनी भाऊ किशोर याच्या डोक्यावर घरातील रिकामा स्टीलचा हंडा मारला व भांडण करून शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याच्यासमवेत असलेल्या सहकाऱ्याने किशोर यांचा हात धरून त्यांना हाताच्या थापटाने मारहाण केली या मारामारीत किशोर याच्या डोकीच्या पाठीमागील बाजुस दुखापत झाली. याप्रकरणी किशोर कांबळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रवींद्र कांबळी व त्यांच्यासमवेत आलेली अनोळखी व्यक्ति यांच्याविरूध्द भादवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तपास पो.हे.कॉ.अमृता बोराडे करीत आहेत.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा