जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आ.वैभव नाईक, अतुल रावराणे, यांचे आवाहन
मालवण तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमांना आज सुरुवात करण्यात आली. पंचायत समिती मतदारसंघनिहाय हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.याची सुरुवात सुकळवाड येथून कऱण्यात आली. त्यानंतर पोईप येथे सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार वैभव नाईक, मालवण तालुका निरीक्षक अतुल रावराणे यांनी मार्गदर्शन करताना सदस्य नोंदणीचे महत्व विशद केले. सदस्य नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र मिळणार आहे. तसेच जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सुकळवाड येथे कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, प्रसाद मांजरेकर, आकू गावडे, महिला तालुका संघटक पूनम चव्हाण, पोईप विभागप्रमुख विजय पालव, उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण, भरत केळवलकर, सुनील पाताडे, नरेंद्र पाताडे, प्रल्हाद वायंगणकर, आनंद सावंत, विकास परब आदी उपस्थित होते.
पोईप येथे आशिष परब, पंकज वर्दम, दीपा शिंदे, नंदू गवंडे, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, मुकुंदे पार्टे, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले, श्वेता सावंत, पूनम चव्हाण, माजी सभापती बाळ महाभोज, नाना नेरकर, बाळा सांडव, बाळू पारकर, कृष्णा पाटकर, गोपीनाथ पालव, शिवरामपंत पालव, गिरीजा पालव आदीसह शिवसेना उपस्थित होते.