सावंतवाडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिल्यानंतर “कुणबी” नोंद शोधण्यासाठी महसूल विभाग कामाला लागला असून हे राष्ट्रीय काम समजून आजच्या सुट्टी दिवशीही शोध मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात ४० कर्मचारी जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर तपासत असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.
तहसीलदार श्रीधर पाटील आणि महसूल नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी ४० कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जन्म-मृत्यू रजिस्टर तपासणी सुरू केली आहे. महसूल दप्तर घेऊन तेही तपासले जाणार आहेत.
माजगाव येथील एका व्यक्तीचे सन १९१९ च्या रजिस्टर मध्ये आडनाव “कुणबीन” असं आढळून आले असून जातही ” कुणबीन” दिसत आहे. ती महसूल अधिकारी तपासून पाहत आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांना याबाबत दुजोरा देत खातरजमा केली जात आहे, असे सांगितले.
सकाळ पासूनच रजिस्टर तपासण्यात येत आहेत तेथे “कुणबी” शब्द आढळून आले नाहीत तरीही बारकाईने तपासणी करून घेतली जात आहे तसेच मोडी लिपी जाणकार देखील या तपासणी मोहीम मध्ये आहेत, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
दरम्यान तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, सावंतवाडी तालुका सावंतवाडी संस्थान अर्थातच राजघराण्याच्या अधिपत्याखाली येतो त्यामुळे राजघराण्याच्या दप्तरी काही नोंदी असतील तर राजेसाहेब यांना विनंती करून पाहता येईल का? त्यासाठी प्रयत्न केला जाईल. हिंदू मराठा नोंदी आढळून येतात त्यामुळे सावंतवाडी संस्थानचे दप्तरी नोंद कशी आहे.ती पाहण्याचा प्रयत्न केला जाईल.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलन छेडले त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युद्धपातळीवर कुणबी नोंद तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे, असे जाहीर केले त्यानूसार सावंतवाडी तालुक्यातील महसूल प्रशासन कामाला लागले आहे.
संवाद मीडिया*
*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*
*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*
*सेल्समन : पदवीधर आवश्यक*
*आकर्षक पगार*
**स्थानिकांना प्राधान्य**
*संपर्क*
*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*
*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*
*📲9822123102*
*📲9423053459*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*