You are currently viewing आजपासून मराठी रंगभूमीवरील ४४ सर्वाधिक पुरस्कार प्राप्त “संगीत देवबाभळी” नाटकाचा कुडाळात शुभारंभ

आजपासून मराठी रंगभूमीवरील ४४ सर्वाधिक पुरस्कार प्राप्त “संगीत देवबाभळी” नाटकाचा कुडाळात शुभारंभ

कुडाळ:

 

 

मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन ठरलेले व ४४ सर्वाधिक पुरस्कार प्राप्त, भद्रकाली प्रॉडक्शन निर्मित संगीत देवबाभळी हे नाटक रविवार दिनांक ५ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे. आज रविवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे प्रयोगाने सिंधुदुर्ग दौऱ्याचा शुभारंभ होत आहे. सिंधुदुर्गमधील रसिकांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नाट्य संयोजक गिरीश महाजन व योगेश कुष्टे यांनी केले आहे.

संगीत देवबाभळी या नाटकाचा प्रयोग आज रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे प्रयोग होत आहे. उद्या सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता वेंगुर्लेतील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये प्रयोग होईल. मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे प्रयोग होणार आहेत.

मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन ठरलेले संगीत देवबाभळी हे नाटक असून प्रसाद कांबळी यांनी भद्रकाली प्रॉडक्शनच्या माध्यमातून ते रंगमंचावर आणले आहे. ४४ सर्वाधिक पुरस्कार प्राप्त देवबाभळी हे नाटक असून नाशिकमधील प्राजक्त देशमुख यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे व लिहिले आहे. नाटकातील नेपथ्य, संगीत, गीते सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. या नाटकामध्ये मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मानसी जोशी व शुभांगी सदावर्ते या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे सध्या भरभरून कौतुक केले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी या नाटकाने प्रचंड गर्दी खेचली आहे. या नाटकातील अभिनय, संगीत, गीत, लेखन या साऱ्यांवरच कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन ठरलेली नाट्यकृती कोकणवासियांना पाहण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. सर्वत्र नाट्यगृहावर तिकीट विक्री सुरू होत आहे, अशीही माहिती संयोजकानी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा