You are currently viewing संस्कार…

संस्कार…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री मोनिका बासरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*संस्कार….*

 

आज काल आधीच्या पिढी चे लोक म्हणून जातात की हल्ली च्या पिढीकडे आपले रूढी ,परंपरा , चाली रीती पाळायला वेळ नाही आणि आवडही नाही . आज काल संस्कार च उरले नाहीत. किती सहज बोलून जातात नाही ? एका बाजूने पाहायला गेलं तर आहेत काही लोक ज्यांना खरच विसर पडलाय सगळ्या गोष्टींचा पण सगळेच त्या वाटेवर वाहवत नाहीयेत हे हि तितकंच सत्य आहे .आपले संस्कार ,संस्कृती नक्की च जपल्या पाहिजेत पण त्या गोष्टी चा अतिरेक होता कामा नये.

श्रद्धा असावी पण त्या श्रद्द्धेला अंधश्रद्देची जोड नक्की च असू नये. आपल्या कडे विनाकारण काही गोष्टीं मागे अंधश्रद्धा जोडली गेलेली आहे , हे उपवास केले तर हा देव पावेल ,हा नवस केला तर देव प्रसन्न होईल , हे नाही केलं तर देव कोपेल . पण खरच फक्त असं वागून देव प्रसन्न होतो का त्या बरोबरीला चांगल्या कर्माची पण जोड हवी ?

एखादी व्यक्ती देवाला खूप दान धर्म करत असेल,अगदी सोन्या रुप्याचे हि दान देत असेल पण तीच व्यक्ती तिच्या दारात कुणी गरजू ,उपाशी आला तर तिच्या शी गैरवर्तन करत असेल तर खरंच त्या व्यक्तीच्या सुवर्ण दानाला काही महत्व आहे का ?

एखादी व्यक्ती खूप जप-तप करत आहे , उपवास – तपास करत आहे पण ती व्यक्ती कुना बद्दल च चांगला विचार करत नसेल,सतत त्या व्यक्ती मुळे इतरांची कळत नकळत मने दुखावल्या जात असतील तर त्या जपा ला काही अर्थ आहे का ?

आपल्या कडे नामस्मरण , सण वार , उपवास ह्या गोष्टी ज्या निर्माण केल्या आहेत त्या मागे काही कारणं आहेत , नामस्मरणाने आपल्या मन शांती मिळते , आपण स्वतःशी एकरूप होतो , सण ,उत्सव हे सगळे एकत्र जमून आनंद घेण्यासाठी आहेत , उपवासा मुळे शरीराला सुद्धा आराम मिळतो .

ह्या गोष्टी आपले मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करण्या साठी निर्माण झाल्या आहेत.

आपण पुजा,आरती,मनाचे श्लोक,उपवास जे असेल ते नक्की च केले पाहिजेत,आपले संस्कार जपायलाच हवेत त्या बरोबरचं आपण आपल्या श्रद्धेला कायम चांगल्या कर्माची जोड दिली पाहिजे ,मग भले हि तुम्हाला रोज पुजा करायला वेळ मिळत नसेल , भलेही तुम्हाला उपवास जमत नसतील पण कायम आपण चांगल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे , त्या आत्मसात केल्या पाहिजेत . प्रत्येक व्यक्ती बद्दल मनात आदर बाळगायला हवा,जमेल तशी आपल्या परीने इतरांना मदत केली पाहिजे, आपल्या वागण्यात-बोलण्यात नम्रता बाळगायला हवी . प्रत्येका विषयी कृतज्ञता मनात ठेवायला हवी .

माणूस म्हणाला कि तो चुका करणारच हे जाणून आपण स्वतःच्या हातुन झालेल्या चुका अगदी प्रांजळ पणे मान्य केल्या पाहिजेत आणि माफी मागितली पाहिजे आणि हाच भाव इतरांपरी देखील बाळगायला हवा आणि माफ करण्याचे सामर्थ्य हि बाळगायला हवे आणि नक्की च ईश्वरप्रति श्रद्धा मनात असायलाच हवी आणि कदाचित आपल्या चांगल्या वर्तणुकीमुळे देव नक्की प्रसन्न होईल , नाही का ?

 

*देवा समोर समई/दिवा किती तास तेवतो ह्या पेक्षा आपल्या मनात किती चांगुल पणाची ज्योत तेवते आहे हे जास्त महत्वाचं आहे कारण चांगलं वागणं , चांगले विचार , इतरांबद्दल आदर-प्रेम , क्षमा , क्षमाशील भावना ह्या गोष्टी सुद्धा संस्कार आणि संस्कृती चा महत्वपूर्ण भाग आहेत.*

 

– मोनिका बासरकर

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा