मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटीलांना पाठिंबा देण्यासाठी वेताळ बांबर्डे मधील सकल मराठा समाज एकवटला…*
गावातील मुस्लिम समाज,तेली समाज व देवळी समाजाने देखील दिला उत्फुर्तपणे पाठिंबा..*
कुडाळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले मराठा मावळे मनोज जरांगे पाटीलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील सकल मराठा समाजाने एकजुट दाखवत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. सकाळी 10 च्या सुमारास वेताळ बांबर्डे हायवे तेलीवाडी बस स्टॉप नजीक मराठा समाजातील महिला,पुरुष व शालेय विद्यार्थ्यांनी सनदशीर मार्गाने उपोषण आंदोलन सुरू केले आहे. गावातील देवळी,तेली व मुस्लिम समाजाने मराठा आंदोलकांची आंदोलन स्थळी भेट घेत आरक्षणास जाहीर पाठिंबा दर्शविला. दरम्यान कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक श्रीमती मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. सरकारने मराठा समाजाचा अधिक अंत न पाहता आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा,आमच्या भावना वरिष्ठ शासन स्तरावर पोहचवाव्यात अशी विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली अन्यथा शांततेत आंदोलन करणारा मराठा समाज कसा पेटून उठतो याची वेळ राज्य सरकारने आणू नये असा इशारा प्रसाद गावडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या वतीने दिला.”जय भवानी जय शिवाजी,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय, अशा घोषणांनी मराठा आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी आनंद भोगले,शैलेश घाटकर, प्रदीप गावडे, आपा गावडे,सुशांत सावंत, देवळी समाजाचे साजुराम नाईक, तेली समाजाचे दिलीप तिवरेकर व दिनेश शिरवलकर, मुस्लिम समाजाचे बाबा मुजावर व सलीम शेख, चंद्रकांत गावडे,नारायण गावडे,दिलीप सावंत,स्नेहा दळवी,वेदिका दळवी,रमण गावडे,संदीप सावंत,आबा घाडी यासंह असंख्य मराठा बांधव उपोषणास बसले आहेत.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*