You are currently viewing ७ नोव्हेंबर रोजी मसुरेत खुली ग्रुप डान्स आणि निमंत्रितांची एकेरी नृत्य स्पर्धा..

७ नोव्हेंबर रोजी मसुरेत खुली ग्रुप डान्स आणि निमंत्रितांची एकेरी नृत्य स्पर्धा..

मसुरे :

 

पावणाई देवी महिला दुग्धोत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे यांच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना *भव्य दिवाळी बोनस* वाटप कार्यक्रम दिनांक *७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री* ९.०० वा. करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून *जिल्हा बँक अध्यक्ष माननीय मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष माननीय डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक माननीय व्हीक्टर डान्टस* हे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्री ८.०० वाजता *भव्य खुली समूह नृत्य* आणि निमंत्रितांची *भव्य एकेरी नृत्य* स्पर्धा डॉ. विश्वास साठे मसुरे बाजारपेठ ता मालवण यांच्या निवासस्थाना नजीक आयोजित करण्यात आली आहे.

*खुल्या समूह नृत्य स्पर्धेची बक्षिसे अनुक्रमे*

प्रथम क्रमांक ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.

 *निमंत्रितांची खुली एकेरी नृत्य स्पर्धा*

प्रथम क्रमांक रोख रुपये ३०००/-, द्वितीय क्रमांक रोख रुपये १५००/-, तृतीय क्रमांक रोख रुपये ७००/-, चतुर्थ रोख रुपये ५००/- आणि ५ ते ८ क्रमांक प्रत्येकी तीनशे रुपये आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह बक्षिसे देण्यात येणार आहेत. दोन्ही स्पर्धा रात्री आठ वाजता सुरुवात करण्यात येणार आहेत.

*उपस्थित महिलांसाठी पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी खास आकर्षण* 

कार्यक्रमा दरम्यान उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून प्रथम तीन क्रमांकासाठी पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी डॉ व्ही एस साठे मो. ९४२११९०८९६, दत्तप्रसाद पेडणेकर मो. ९३७३८५५६४३, बाबू आंगणे मो. ७५८८४०९५३९ येथे संपर्क साधावा. सर्वांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन पावणाई देवी महिला दुग्धोत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे व मसुरे पर्यटन संस्था यांच्या वतीने डॉ. विश्वास साठे आणि दूध उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा सौ. अल्का साठे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा