You are currently viewing कोण म्हणतो रस्ता होणार नाय, करून घेतल्या शिवाय राहणार नाय!

कोण म्हणतो रस्ता होणार नाय, करून घेतल्या शिवाय राहणार नाय!

*कोण म्हणतो रस्ता होणार नाय, करून घेतल्या शिवाय राहणार नाय!*

*तळेरे ते गगनबावडा रस्त्यासाठी शिवसेनेची करूळ ते नाधवडे पर्यंत २१ किमी पदयात्रा*

*खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते सहभागी*

तळेरे ते गगनबावडा रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासन याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली करूळ ते नाधवडे अशी पदयात्रा काढण्यात आली. व रस्त्याची पाहणी करण्यात आली. करूळ ग्रामपंचायत कार्यालयाकडे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रेच्या शुभारंभ करण्यात आला. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोण म्हणतो रस्ता होणार नाय, करून घेतल्या शिवाय राहणार नाय!, शिवसेना जिंदाबाद!, महाविकास आघाडीचा विजय असो! अशा गगनभेदी घोषणा देऊन शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कॉर्नर सभा घेऊन शिवसेना नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी आमदार ए. पी. सावंत यांच्या प्रतिमेस व शहीद विजय साळस्कर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सिंधुदुर्गातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तळेरे ते गगनबावडा हा महत्वाचा रस्ता आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी २५० कोटी रुपये मंजूर झालेले होते. त्यानुसार निविदा प्रक्रियाही झाली. दोन लेनच्या या रस्त्यासाठी भवानी कन्स्ट्रक्शन यांनी ४० टक्के बीलोने ११० कोटीला टेंडर भरले व मंजूर झाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये निविदा मंजूर होऊनही आद्यप हे काम सुरू झालेले नाही.या दोन लेनच्या रस्त्यासाठी १६३ हेक्टर जमीन संपादनाची गरज असून त्यातील ९६ टक्के जमीन संपादित आहे. त्यामुळे काम सुरू होण्यास कोणतीही अडचण नाही. पाऊस कमी झाल्यावर काम सुरू करतो, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले होते. मात्र, अद्याप काम सुरू होऊ शकलेले नाही. तसेच रस्त्यावरील खड्डेही भरलेले नाहीत त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून नियमित वाहतुकीसोबत चिरे, ऊस, सिलिका व इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत आज शिवसेनेकडून पदयात्रेतुन आवाज उठविण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमूख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,राजू शेटये,नंदू शिंदे, सचिन सावंत, शैलेश भोगले, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर, काँग्रेसचे प्रदीप मांजरेकर,दादामिया पाठणकर, कासीम याकूब चोचे,बाशा अब्दुल रेहमान,प्रवीण वरुणकर,राष्ट्रवादी अनंत पिळणकर,शिवाजी घोगळे,वैदेही गुडेकर, गोट्या कोळसुकर,प्रमोद मसुरकर,रामू विखाळे,संतोष परब,निसार शेख,संजय पारकर,राजू रावराणे, हर्षद गावडे, भालचंद्र दळवी, रिमेश चव्हाण,सिद्धेश राणे,संदीप सरवणकर, स्वप्नील धुरी, रोहित पावसकर, दिव्या साळगावकर,संजना कोलते,धनश्री कोलते,माधवी दळवी,पराग म्हापसेकर,लक्ष्मण रावराणे,गिरीधर रावराणे,सुनील रावराणे, गुलजार काझी, श्री. लांजेकर, धनंजय हिर्लेकरशिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*☘️ ही दिवाळी साजरी करा सुरक्षित ह्युंदाई कार्स सोबत…!!*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा