मालवणात उद्या व्यापाऱ्यांची बैठक…
बैठकीला व्यापारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे नितीन वाळके यांचे आवाहन
मालवण
व्यापारात आलेली मंदी, ऑनलाईन विक्री, परप्रांतीय व फिरत्या व्यापाऱ्यांचे वाढते अतिक्रमण आदींबाबत व्यापारी वर्गात सातत्याने चर्चा सुरु असते. या चर्चेवेळी जिल्हा व्यापारी महासंघाने यावर काहीतरी मार्ग काढावा, अशी अपेक्षाही सर्वस्तरातून व्यक्त होत असते. या सर्व स्पर्धा व अडचणींवर मात करून इथला व्यापार-उदीम इथल्यांच्याच हातात राहवा, या दिशेने गेल्या चार वर्षांच्या विचार प्रक्रियेतून जिल्हा व्यापारी महासंघाने काही मार्ग निश्चिती केली आहे. याकामी मालवणातील युवा व्यावसायिक निहार नाना साईल यांनी मांडलेल्या व परिश्रमपूर्वक निर्मिलेल्या संकल्पनेचे प्रथम सादरीकरण सर्व व्यापाऱ्यांसमोर करून पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. मालवण येथील दैवज्ञ भवन येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला व्यापारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यापारी महासंघाचे नितीन वाळके यांनी केले.