You are currently viewing नौसेना दिनासाठी सात ठिकाणी हेलिपॅड चे नियोजन

नौसेना दिनासाठी सात ठिकाणी हेलिपॅड चे नियोजन

नौसेना दिनासाठी सात ठिकाणी हेलिपॅड चे नियोजन

चीपी विमानतळावर नाईट लँडिंग यंत्रणेबाबतही फक्त सूचना : मालवण मध्ये नौसेनेची असणार कडक सुरक्षा व्यवस्था

मालवण

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यंदाचा ‘नौसेना दिवस’ मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी प्रशासनाने आतापासूनच आहे. काम सुरू केले प्रमुख पाहुण्यांच्या आगमनासाठी हेलिपॅड तयार केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी चिपी विमानतळ सिंधुदुर्ग किल्ला, आंगणेवाडी आणि शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय (कुंभारमाठ) व अन्य ठिकाणी असे सात हेलिपॅड तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चिपी विमानतळावर नाईट लैंडिंग यंत्रणा बसविण्या बाबतही विकासक कंपनीला सक्त सूचना दिल्या आहेत. यावर्षी भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासाठी मालवणमध्ये भारतीय नौसेनेची कडक सुरक्षा असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा वेळेत बसवून घेण्यासाठी आयआरबी या विकासक कंपनीला आदेश दिले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण या नियोजनाकडे जातीनिशी लक्ष देत आहेत. या कार्यक्रमासाठी दिल्लीतही बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ४ डिसेंबरच्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी आतापासूनच सुरुवात केली आहे.

चिपी विमानतळ ते मालवणपर्यंतचे रस्ते ठिकठिकाणी खड्डेमय झाले आहेत. त्यांची कधी डागडुजी होणार, हाही प्रश्न या दौऱ्यानिमित्त उपस्थित झाला आहे. नौदल अधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी याच पार्श्वभूमीवर नौदलाचे वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून त्यांच्याकडून चिपी विमानतळाची पाहणी केली, जात आहे.

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा