You are currently viewing २९ ऑक्टोबर रोजी बांदा येथे कोजागिरी पौणिर्मेला श्री साईबाबा उत्सवाचे आयोजन

२९ ऑक्टोबर रोजी बांदा येथे कोजागिरी पौणिर्मेला श्री साईबाबा उत्सवाचे आयोजन

सावंतवाडी :

 

२९ ऑक्टोबर शनिवार रोजी बांदा येथील काणेकर कुटुंबियांतर्फे  कोजागिरी पौणिर्मेला श्री साईबाबा उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता श्री साईबाबांची महापूजा, १२ वा. आरती, १ ते ३ दरम्यान महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, रात्री ९ वा. पहिल्या सत्रात गोव्यातील भजनी गायक पांडुरंग राऊळ, विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गांवस, मिलींद परब व मोहन पेडणेकर यांचा पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होईल. दुसर्‍या सत्रात रात्री ११ वाजता पुणे येथील सौरभ काडगावकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना तुळशीदास नावेलकर तबला व राया कोरगावकर हार्मोनियम साथसंगत करतील.

त्यानंतर तिसर्‍या सत्रात गोवा येथील सम्राज्ञी शेलार यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्याना बुद्धेश तळकर हे तबला तर सुनाद कोरगावकर हार्मोनियम साथसंगत करतील. कार्यक्रमांसह श्री साईबाबा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन काणेकर कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा