You are currently viewing सुप्रिया सुळे यांना राज्यापेक्षा देशाच्या राजकारणात रस

सुप्रिया सुळे यांना राज्यापेक्षा देशाच्या राजकारणात रस

वृत्तसेवा
काही दिवसापूर्वी भाजप प्रदेधाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली मुलगी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री पदी बसवायचे आहे असे वक्तव्य केले होते. पाटील यांच्या या वक्तव्याला उत्तर देत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राज्यापेक्षा देशाच्या राजकारणता रस आहे असे मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे बघता का?, असा प्रश्न शरद पवार यांना केला केला असता त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, तिचा अधिक रस राज्यातील राजकारणात नसुन देशाच्या राजकारणात आहे. तिला सर्वोत्तम संसदपटूचे पुरस्कारही मिळालेत आहेत. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. तिची आवड देशाच्या राजकारणात आहे. ज्याची आवड जिथे तो तिथे असतो. असे शरद पवार म्हणाले.

तसेच, याचबरोबर, शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे सोपविले पाहिजेत, अशी अनेकदा चर्चा होते. याबाबत विचारले असता यासंदर्भात पवार म्हणाले, तरूणांचा संच मोठा आहे. यामध्ये मान्य असलेले अनेक लोक सांगु शकातो. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील , धनंजय मुंडे असे अनेक लोक आज या पक्षामध्ये कुवेतिचे आहेत. असे पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे सुत्रे नेमकी कुणाकडे जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा