You are currently viewing ✨गारवा अन् चांदणं✨

✨गारवा अन् चांदणं✨

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम ललित लेखन*

 

*✨गारवा अन् चांदणं✨*

 

हे चांदणे फुलांनी

शिंपित रात्र आली

धरती प्रकाशवेडी

ओल्या दवात न्हाली……

गारवा आणि चांदण्यांचं नातं किती छान आहे ना,हवंहवंसं वाटणारं……।

गारवा शब्द आठवताच पहाट आणि रात्रीची अंगावर उमटलेली गोड शिरशिरी जाणवते..मुग्ध मधुर काजळरात्रीतील सख्याची आतुरलेली भेट..तो प्रणयधुंदीतील प्रेमालाप..बोलताना तरी कुठे भान उरतं…गारवा छळत असतो मनाला नुसता.

त्या उबदार बाहुपाशाच्या विळख्यात केव्हा विरघळून जाऊ असं वाटणारं..या धुंद गारव्यात मोगरा रातराणीही जणू प्रेमालापात दरवळायची ,

पुटपुटत्या शब्दांना जणू अत्तर

माखत यायची. गंधधुंद…वृक्ष वेलींची पर्णे

अलगद नेत्र मिटून घेत आपली.

वातावरणात भारावलेला हा गारवा तनामनाला तुझ्या अधीरल्या मिठीने उबदार करायचा..!

आकाशात ती चमचमती चांदणमाळ..लक्ष लक्ष दीप आभाळभर उजळून आकाशगंगेत दीपोत्सव साजरा

करायची .रुपेरी चमचमते वस्र झुळझुळ वा-याने इतस्ततः व्हावे आणि मेघांनी ते लगेच किंचित झाकावे…ही तारकांची गोंधळलेली अवस्था मनाला किती भुरळ पाडायची..चंद्र मात्र ते बघून उगाच गालात मिष्कील हसून घ्यायचा…!

मेघांच्या झिरझिरीत ,तलम वस्त्रात अवगुंठीत चांदणरुपडं

डोळ्यात किती भरुन घ्यावं ,असं वाटायचं!

गारव्यात पहाटेचं दव पानाच्या टोकाशी जणू गोठून जायचं,तेजःपुंज मोतीमाळच जणू..पाखरं सोनसळी किरणांची वाट बघत,पंखात ऊब भरून घ्यायची,ती धुक्यात हरवलेली पहाट..पूर्वेला क्षितिजावर केशरगोल उषेची वाट बघत हळूहळू प्रवेशला की

चांदणदीप विझू लागत…मंद मंद होणा-या चांदण्यासवे चंद्रकोरही कधी लुप्त व्हायची,कळतही नव्हते…!

झुंजूमुंजू होताच तो गारवा आता अधिक झोंबू लागे…

तुझ्या माझ्यातील अंतर मिटवत… फक्त उब शोधत..

सुंदर प्रहर..निशा माघारी जातेय आणि उषेचा प्रवेश व्हायचाय…

सारंच अर्धोन्मिलीत नेत्रांत धूसर होतंय….!

ती अद्वैत जीवांची प्रणयी प्रभात….

एक शेर आठवतो….

उबदार स्पर्श त्याचे मी पांघरीत आहे

दव सांडले धुक्याचे हलकेच पीत आहे….किती कोमल ,मलमली भाव…!

जडावल्या पापण्यांनी स्वप्नाना दूर जायला अनुमती दिली तशी

सोनसळी किरणं प्रवेशू लागायची

ते धुंद चांदणं नभातून मनात उतरायचं….आणि गारव्यातला विळखा सैलावू लागायचा अलवार…..!

उबदार गारवा..विझत चाललेलं चांदणं….!

०००००००००००००००००००

 

*लेखन…अरुणा दुद्दलवार✍️*

 

 

*संवाद मिडिया*

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

*सविस्तर वाचा👇*

————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

*सुविधा :*

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

▪️भूकंपरोधक बांधकाम

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

▪️आकर्षक लॉबी

▪️लिफ्टची सोय

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

▪️पाण्याची 24 तास सोय

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

▪️अंतर्गत भुयारी गटारे

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा