*संमेलनाध्यक्षपदी फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश तराळ यांच्या नावाची झाली घोषणा*
अमरावती :
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन 24 डिसेंबर 2023 रोजी अमरावती येथे आयोजित करणार असल्याची फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सतीश तराळ यांनी नुकतीच घोषणा केली. प्रसंगी या संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतेच झूम मीटिंग द्वारे डॉ. सतीश तराळ यांच्या नावाची घोषणा केली. अष्टमीच्या दिवशी पवित्र नवरात्र महोत्सवात ही घोषणा करण्यात आली. अंबादेवीच्या पवित्र भूमीमध्ये अमरावती मध्ये हे संमेलन जाहीर करण्यात आले. उज्जैनकर फाउंडेशन तर्फे एक राज्यस्तरीय व अखिल भारतीय अशी दोन संमेलन आयोजित करण्यात येतात त्यापैकी पहिले राज्यस्तरीय शिव बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन हे आदिशक्ती संत मुक्ताई नगरीमध्ये तर पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा. भ. बोरकर साहित्य नगरी बोरी फोंडा, गोवा या ठिकाणी आणि दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी पन्हाळागड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी तर दुसरे राज्यस्तरीय शिव बाल किशोर व मराठी साहित्य संमेलन नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरीत दिमागदार सोहळ्यात संपन्न झाले होते.
अमरावती येथील नुकतेच जाहीर केलेले तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन सुद्धा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने व उपस्थितीने संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक कथाकार डॉ. सतीश तराळ यांची नुकतीच निवड करण्यात आली. याप्रसंगी या झूम मीटिंगमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर राज्य अध्यक्ष डॉ.सतीश तराळ राज्य संपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत पाटील, राज्य समन्वयक प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, राज्य सहसचिव डॉ.अशोक शिरसाट राज्य खजिनदार कवी रामदास कोरडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकरराव अनासुने, बुलढाणा जिल्हा सदस्य श्री बाळूभाऊ ईटणारे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर पोतदार साहेब, जळगाव जिल्हा सचिव श्री गणेश कोळी, ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर, पुणे जिल्हा पदाधिकारी श्री रामचंद्र गुरव, धाराशिव जिल्हा समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी या झूम मीटिंगचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा सचिव श्री गणेश कोळी सर यांनी केले तर आभार छत्रपती संभाजी नगरचे संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे यांनी मानले.