You are currently viewing जिद्धीच्या जोरावर सिंधुपुत्राची गगनभरारी

जिद्धीच्या जोरावर सिंधुपुत्राची गगनभरारी

जिद्धीच्या जोरावर सिंधुपुत्राची गगनभरारी

लक्ष्मण भुते झाले महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता

महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांचे मिळाले मार्गदर्शन

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्हा आता अधिकाऱ्यांचा जिल्हा बनू पाहत आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील युवक व युवतीनी यश मिळवण्यासाठी आता कंबर कसली आहे. गड किल्ल्यांचा, साहित्यसम्राटांचा आणि निसर्गसंपदेने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा आता सेवा बजावणाऱ्यांचा जिल्हा होणार आहे, असे सकारात्मक चित्र निर्माण होत आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सिंधुपुत्र लक्ष्मण अभिमन्यू भुते यांची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली आहे.

उभादांडा, कुर्लेवाडी, ता. वेंगुर्ला येथील लक्ष्मण अभिमन्यू भुते यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (वर्ग 2) पदावर म्हणून सरळ सेवेतून नियुक्ती झाली असून त्यांच्या या घवघवीत देशाबद्दल त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

लक्ष्मण भुते यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वर्ग दोन अधिकारी म्हणून मिळवलेले यश हे अनेकांना प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई – वडील, मार्गदर्शन करणारे गुरुवर्य, तसेच सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांना दिले आहे.

लक्ष्मण अभिमन्यू भुते, रा. उभादांडा, कुर्लेवाडी, ता वेंगुर्ला.यांचा पारंपरिक व्यवसाय हा मच्छिमारी आहे. त्यांचे वडील हे श्रमिक मच्छिमार व आई गृहिणी. लक्ष्मण  भुते यांनी अधिकारी व्हावं, ही वडीलांची पहिल्यापासून अपेक्षा होती. प्राथमिक शिक्षण हे पूर्ण प्राथमिक शाळा उभादांडा क्र 3 मध्ये झाले. त्यानंतर शासकिय तंत्रनिकेतन मालवण येथे 3 वर्ष पदविका फर्स्ट क्लासमध्ये पास केली. यात  प्रा. राज्याध्यक्ष सर यांचा त्यांना  मार्गदर्शन लाभले. त्यानंतर MITM ओरस येथे 3 वर्षांची पदवी पूर्ण केली. नंतर घरच्या जबाबदारीमुळे खासगी नोकरी सुरू केली. नोकरी करता करता वाटायचं की वडिलांचं स्वप्न तर राहूनच गेलं पूर्ण करायचं.!, ही खंत नेहमी मनात असायची. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला बघितलं की खूप अभिमान व्हायचा, अन् हेवा पण वाटायचा. पण घरच्या परिस्थितीमुळे नोकरी सोडणं शक्य वाटत नव्हतं, मला वाटत घरची जबाबदारीमुळेच आपल्या कोकणातील मुलं सरकारी अधिकारी बनायची कुवत असून देखील मागे पडत आहेत. त्यानंतर कोरोना आला. माझी नोकरी सुटली, पण माझे वडील माझ्यामागे खंबीर उभे राहिले. मी घरी बेरोजगार असतानाही ते माझं सगळ्या गरजा पूर्ण करत होते. तेव्हा माझ मन मला सांगत होत की, यांचं स्वप्न तुला पूर्ण करायची ही संधी मिळाली आहे, याचं सोन कर.!.

त्यानंतर सगळीकडे अनिश्चितता दिसत असली तरी माझ्या जीवनच ध्येय मला मिळालं होतं. आत्ता फक्त ते सत्यात उतरवायचे होते. पण कंपनीमधील खासगी नोकरी करत तयारी कारण खूप अवघड होतं होते. म्हूनन मी MITM या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘व्याख्याता’ म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. यामुळे मला अभ्यासला पुरेसा वेळ देता येत होता. तसेच गरजे पुरते खर्च ही भागत होते, येथे मला नोकरी करायची संधी देणारे MITM प्राचार्य नवले सर व आमचे विभाग प्रमुख कुशे सर यांचे विशेष आभार मानतो. या काळात माझी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणा मध्ये कनिष्ठ अभियंता या पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रमध्ये 247 वी रँक येऊन प्रतीक्षा यादीत समाविष्ट झालो पण अजून माझा वेळ यायचा होता. मी प्रत्येक दिवस यशाची एक एक पायरी पुढे चढत होतो पण स्पर्धा परीक्षा च कालखंड हा मोठा असतो त्यामुळे अनिश्चितेचे उतार चढाव, कामाचा ताण येत असायचे यात मला नेहमी नवी उमेद द्यायचे, असे माझे सहकारी विठ्ठल राऊळ, वैभव साबळे, स्वागत केरकर सर याचे ही विशेष आभार अखेर जलसंपदा विभागमधील कनिष्ठ अभियंता परीक्षेच प्रवेश पत्र आले. पण त्यावेळी खासगी नोकरी संभाळत अभ्यास करण्यास वेळ कमी मिळत असल्यामुळे मी त्या खासगी नोकरीचा राजीनामा दिला व अभ्यासाला लागलो. त्यानंतर माझे नाव निवड यादीमध्ये महाराष्ट्रमध्ये 46 नंबरला आले, खरंच केलेली मेहनत कधी वाया जात नाही, यावर पक्का विश्वास बसला.
मला असा वाटतं की जर तुम्हाला घरची परिस्थिती सांभाळत अधिकारी बनायचं असेल तर, येणाऱ्या अडचणीना न घाबरता, छोटी मोठी खासगी नोकरी धरा व अभ्यासातील सातत्य कमी होऊ देऊ नका, बघा एक दिवस तुमचंही स्वप्न पूर्ण होईल, जसं माझं झालं.!
महेंद्रा अकॅडमी सावंतवाडीच्या माध्यमातून मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले, त्यामुळे महेंद्रा अकॅडेमीचे देखील खूप खूप आभार मानतो. या प्रवासात माझ्या सोबत माझा ‘कणा’ म्हणून उभे राहिलेले माझे आई-वडील, गुरुजन, मित्र परिवार व महेंद्र पेडणेकर सर यांचे खूप खूप आभार लक्ष्मण भुते यांनी मानले आहेत.

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा