You are currently viewing श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी प्रथम तर श्री देव मुसळेश्वर मळेवाड द्वितीय..

श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी प्रथम तर श्री देव मुसळेश्वर मळेवाड द्वितीय..

*श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आरोस आयोजित भजन स्पर्धा थाटात संपन्न*

 

सावंतवाडी :

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री देवी माऊली नवरात्रौत्सव मंडळ, आरोस यांच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेचे उदघाटन भजन स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने श्री.शिवाजी परब, श्री.निलेश परब, श्री.बाबी परब, श्री.दीपक पटेकर, श्री.भाई देऊलकर, सत्यवान नाईक, अमर नाईक, निखिल नाईक, भरत परब आदींच्या हस्ते पार पडले. यावेळी आरोस पंचक्रोशीतील अनेक भजन प्रेमी रसिक श्रोते मध्यरात्र उलटून गेल्यावरही उपस्थित होते.

श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आयोजित भजन स्पर्धेत एकूण सात भजन मंडळांचे संघ सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने नवचेतना भजन मंडळ, पालये गोवा, सनामदेव प्रासादिक भजन मंडळ, सांगेली, श्री माऊली भजन मंडळ, साटेली, श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, कुडाळ, श्री देव मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मळेवाड, श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पाडलोस, श्री देवी भवानी भजन मंडळ, रेवटेवाडी या संघांनी सहभाग घेतला होता. एकापेक्षा एक सरस नमन, नोटेशन, अभंग, गौळण, गजर सादर करून आपल्या बहारदार जादुमय आवाजाने प्रत्येक बुवांनी रसिक श्रोत्यांचे कान तृप्त केले. साटेली भजन मंडळाचे बुवा सत्यनारायण कळंगुटकर यांच्या जादुई आवाजाची सर्वांनी वाहवा केली. रात्रीचे ३.०० वाजले तरी भजन प्रेमी रसिक श्रोते भजनाचा आनंद लुटत होते. त्यामुळे कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत येत गेली.

स्पर्धा समाप्ती नंतर तात्काळ यास्पर्धेचा निकाल देण्यात आला. यात उत्कृष्ट गायन – सत्यनारायण कळंगुटकर, साटेली, शिस्तबद्ध संघ- नवचेतना भजन मंडळ, पालये गोवा,

उत्कृष्ट तबला वादक- श्री भावेश राणे,

उत्कृष्ट पखवाज वादक – श्री शुभम गावडे, उत्कृष्ट हार्मोनियम – श्री अक्षय जाधव, उत्कृष्ट कोरस – श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पाडलोस, अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचा खरा निकाल जाहीर झाला तो स्पर्धेतील यशस्वी संघ कोण हे ठरल्यावर. यात प्रामुख्याने उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले ते श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली रोख २००० चषक व सन्मानपत्र,

तृतीय क्रमांक – सनामदेव प्रासादिक भजन मंडळ, सांगली रोख ३०००/- चषक व सन्मानचिन्ह,

द्वितीय क्रमांक – श्री देव मुसळेश्वर भजन मंडळ, मळेवाड रोख ५०००/- चषक सन्मानचिन्ह,

प्रथम क्रमांक – श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी कुडाळ, रोख ७०००/- चषक व सन्मानपत्र यांना देण्यात आला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण आयोजक निखिल नाईक, बाळा परब, दीपक पटेकर, संदेश देऊलकर, अमर नाईक, महेश कुबल, आनंद राऊळ, रितेश नाईक, सत्यवान नाईक, भाई देऊलकर, बबन देऊलकर, अक्षय देऊलकर, गोट्या देऊलकर, विनायक नाईक, अनिल सावंत, सुहास ऊगवेकर, रुपेश पटेकर, नंदू परब, आनंद परब, राजन परब, सुनील परब, प्रथमेश परब आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. आरोस येथील दशावतारी नाटकात खलनायकाची भूमिका करणारे प्रसिध्द नाट्य कलाकार संतोष रेडकर यांनी सूत्रसंचालन केले. तर परीक्षक म्हणून श्री.रुपेंद्र परब, वडखोल, वेंगुर्ला यांनी काम पाहिले. रंगमंच व्यवस्था श्री.महेश आरोलकर, व ओंकार परब यांनी आणि ध्वनिमुद्रण व्यवस्था पंडित यांनी केली. आभार निखिल यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा