*ओंजळीतील शब्दफुले समूह सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे यांनी दिलेला पुस्तक परिचय*
*ज्याचा त्याचा संघर्ष*
…कथासंग्रह…
*– लेखिका अंजना कर्णिक*
‘ताठ मानेनं, निर्मळ चारित्र्याची आस बाळगत जगणाऱ्या प्रत्येकास अर्पण असलेला ‘ हा माझी प्रिय सखी अंजना कर्णिक हिचा *ज्याचा त्याचा संघर्ष* हा कथासंग्रह बरेच दिवस वाचनाच्या प्रतीक्षेत होता. लेखिकेचे यापूर्वीचे ‘आनंद बोल’ आणि ‘भावतरंग’ हे काव्यसंग्रह मी वाचलेले आहेत. प्रकाश वाट हा कथासंग्रह मात्र मी वाचलेला नाही पण त्यातील काही कथा या वेगवेगळ्या अंकातून वाचावयास मिळाल्या होत्या. *ज्याचा त्याचा संघर्ष* हा लेखिकेचा दुसरा कथासंग्रह. सदर कथा संग्रहात एकूण 14 कथा आहेत.प्रस्तुत कथासंग्रह वाचताना जणूकाही आपल्याच मनातील आशय या कथांमध्ये आहे, असं वाटत राहतं. वाचून झालेली कथा बराच वेळ मनामध्ये रेंगाळत राहते आणि कथेतील पात्रांविषयी मनामध्ये चिंतन चालू राहतं. या दीर्घकथा नाहीत; परंतु यांच्यामध्ये सखोल सामाजिक आशय आढळतो. अर्थपूर्ण व प्रवाही अशा या कथा वाचताना वाचकाला खिळवून ठेवतात. छोट्या छोट्या वाक्यातून कथेतील संवादांची फेक कथेला सजीवता देते आणि वाचकाला ती कथा आपल्या सभोवताली घडणारी आहे, जणूकाही आपलीच आहे, असं वाटत राहतं.
दैनंदिन जीवन जगताना आपल्या आजूबाजूला अशा लहान-मोठ्या अनेक घटना घडत असतात आणि त्यातून काही प्रश्न हे मनाच्या गाभाऱ्यात शिरून आपल्याला विचार प्रवण करतात कित्येकदा त्याबद्दल आपल्यालाही व्यक्त व्हावंसं वाटतं किंवा त्यांच्याबद्दल समाजव्यवस्थेला, परिस्थितीला प्रश्न विचारावेसे वाटतात परंतु त्या गोष्टी मनातच राहतात पण लेखिका मात्र हे प्रश्न समर्थपणे आपल्या कथांमधून सातत्याने मांडताना दिसते. कथांमधील पात्रांचे संवाद आणि त्यांचे परस्पर संबंध वाचकाला आपलेसे वाटतात. सभोवतालचे वास्तव आणि लेखिकेच्या मनातील कल्पना यांची चित्त वेधक मांडणी वाचकाला भावते. त्या पात्रांशी वाचक तात्यात्म्य पावतो आणि त्याला जणू काही आपलंच प्रतिबिंब या कथांमध्ये आढळून येतं.
स्वतः लेखिकेला अध्यापन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहेच शिवाय लेखिका इनरव्हील क्लब, वनिता समाज, सखी, आम्ही लेखिका यासारख्या विविध सामाजिक आणि साहित्यिक संस्थांमधून सातत्याने कार्यरत असल्यामुळे, सभोवताली घडणाऱ्या घटनांचा कार्य कारणभाव काय असेल हे उत्कटतेने समजून घेण्याची सवय तिला आहे. समोरच्याला काय म्हणावयाचे आहे किंवा त्याच्या मनात काय आहे हेही लेखिका कुशलतेने जाणून घेऊन ते आपल्या कथांमध्ये सहज शैलीत मांडू शकते.
प्रत्येकालाच आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांशी, परिस्थितीशी संघर्ष करत जगायचं असतं. जन्मापासून जीवनाच्या अंतापर्यंत माणसाचं हे असं लढणं चालूच असतं. हे लढणं अर्थात प्रत्येकाचं वेगवेगळं. लढण्याची रीतही प्रत्येकाची वेगवेगळी; पण हे संघर्षमय कार्य जितकं खंबीरपणे जो करेल तितकं त्याला आपलं अस्तित्व व अस्मिता टिकवणं सोपं होतं. सुखदुःखांच्या लाटांवर आपल्या जीवनाचे तारू हेलकावे घेत असतं पण त्याला मनाचा तोल जाऊ न देता निश्चयपूर्वक वल्हवत राहायचं असतं, हे ज्याला जितकं कळतं तितकं त्याचं आयुष्य यशस्वी व अर्थपूर्ण होत जातं. आजची स्री हे मोठ्या धीरानं व संघर्षाला तोंड देत करीत आहे.हेच ह्या कथा प्रतिध्वनित करतात.
*मुक्तिपथावर* या कथेची नायिका वंदना. ही मनस्विनी एका संघर्षकारी स्रीचे प्रतिनिधित्व करते. स्वतःच्या श्रीमंत नवऱ्याची प्रत्यक्ष काळी बाजू स्वत: प्रकाशात आणते. नवऱ्यानं तिच्याशी घटस्फोटाचा दावा दाखल केला, तिच्यावर भलतेसलते आरोप लावले, न्यायालयात खोटेनाटे पुरावे सादर केले तेव्हा तिची मुलंही तिला सोडून वडिलांकडेच राहणं पसंत करतात; पण तरीही ही मानिनी, आदर्श मूल्यांसाठी विचारपूर्वक घटस्फोट स्वीकारते. संसार मोडताना पाहून ती हारत नाही; उलट समाजसेवेचं व्रत अंगीकारते आणि महिलांवरील अन्यायाविरूद्ध वाचा फोडत, आपली वेगळी वाट स्वतंत्रपणे, ठामपणे चोखाळते अशी ही कथानायिका, कणखर वंदना वाचकाला भावते.
*अॅनिमेटेड पात्रांच्या जगात* ही तर एक सुंदर विज्ञानकथा आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांचा कल्पक वावर वाचकाला भुरळ पाडतो. स्क्रीन वरील पात्र सजीवांप्रमाणे बोलू लागतात हे किती रंजक व आश्चर्यकारक आहे!
*पुनरावृत्ती* कथेतील गौरीची लेक हर्षा माघारी येते ही कथा पालकांसाठी एक उत्तर समुपदेशन करणारी कथा होय.
*जखमा उरातल्या* मधली सुमन, आजारी नवऱ्याचा इलाज करण्यासाठी पैसै कुठून आणायचे या विवंचनेने ग्रासलेली …आपल्या छोट्या कन्येला पैशांच्या बदल्यात, मोठ्या कष्टानं, एका श्रीमंत निपुत्रिक मुखियाच्या ओटीत घालते..दारिद्र्य रेषेखालील गरीब असहाय्य जीवनाचं दर्शन वाचकाच्या काळजाला हात घालतं, मनाला भिडतं.
*मुक्ता* – आई-वडिलांकडून वारसाहक्कानं आलेला ‘मानस’ बंगला निर्मलाचा पती तिला न विचारता शेठजीशी विक्रीचा व्यवहार ठरवतो तेव्हा तिच्यातली स्वाभिमानी, संवेदनशील समाजसेविका ठामपणे ह्या व्यवहारास विरोध करते व पुढील जीवनात संघर्षाला व संभाव्य एकटेपणाला स्वीकारते.
*सत्यमेव जयते!* प्रशांत सावरकर या ‘युनिक फार्मा’ औषधकंपनीतील, अतिशय प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या आत्महत्येमागील कारण, तिचा भाऊ व खासगी डिटेक्टिव्ह यांच्या सहकार्याने उघडकीस आणणारी त्यांची लेक गौरी ही एका न्याय मिळवणाऱ्या विचारशील व सजग मुलीचं प्रतिनिधित्व करते.
सदर संग्रहातील फक्त सहा कथा मी अल्पशा उघड केल्या आहेत. मला लेखमर्यादा सांभाळत, वाचकांची उत्सुकताही ताणावयाची आहे.
या पुढील स्वरगंगेच्या काठावरती, मना सज्जना, वाट परतीची, मानिनी, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, अव्यक्त मनाचे खेळ जीवघेणे,कोरी पाटी, ज्योतीने तेजाची आरती ह्या कथाही एकंदर सामाजिक प्रश्न हाताळत, संघर्षाला न डगमगणाऱ्या, आदर्श मूल्यांना जपणाऱ्या स्रीचे प्रतिनिधित्व करत आपल्यासमोर दाखल होतात.
प्रत्येकानं हा कथासंग्रह विकत घेऊन वाचावा व आपल्या संग्रही ठेवावा असे वाटते.
पुष्पा कोल्हे
चेंबूर , मुंबई
*संवाद मिडिया*
*स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर – माधवबाग*
*Advt Link👇*
————————————————–
*जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने*
*स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर*
*दि. 22 ऑक्टोंबर 2023, वार – रविवार वेळ स 7.00 ते स 11.30 पर्यंत*
*खाली दिलेल्या आजारांवर रक्त तपासणी केली जाईल*
हृदयरोग ,मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हरचे विकार, व्हिटामिन्स, हाडांची ठिसूळता ,थायरॉईड ग्रंथीचे विकार,किडनी, ॲनिमिया
1) *ॲडव्हान्स पॅकेज ~4600~ फक्त 999/- मध्ये*
2) *ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + व्हिटामिन्स पॅकेज ~6900~ फक्त 1699/- मध्ये*
👉 *सूचना – उपाशीपोटी सॅम्पल द्यावे*
👉 *नाव नोंदणीसाठी संपर्क*📝
*माधवबाग*
कणकवली – 9373183888
कुडाळ – 9011328581
सावंतवाडी – 7774028185
सागावकर हॉस्पिटल माणगाव – 9421390281
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*