You are currently viewing यशासाठी शॉर्टकट नसतो, यशासाठी लागते ती प्रचंड जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा – पीएसआय अमित गोते

यशासाठी शॉर्टकट नसतो, यशासाठी लागते ती प्रचंड जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा – पीएसआय अमित गोते

यशासाठी शॉर्टकट नसतो, यशासाठी लागते ती प्रचंड जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा – पीएसआय अमित गोते

महेंद्रा अकॅडेमी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सावंतवाडी

यशासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो, तर यश मिळविण्यासाठी लागते ती प्रचंड जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. विद्यार्थी दशेत यश मिळविण्यासाठी क्षणभर प्राप्त होणारे सुख आणि भौतिक लालसा यांचा त्याग करता आला पाहिजे, प्रलोभनांना बळी न पडता, ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. तरच यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय अमित गोते यांनी येथे केले.

सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडेमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन व्याख्यानात सपोनि अमित गोते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर उपस्थित होते. प्रारंभी पीएसआय अमित गोते यांचे अकॅडेमीच्या वतीने महेंद्र पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीएसआय अमित गोते म्हणाले, अलीकडे सोशल मीडिया आणि त्यावर येणारे वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने यामुळे तरुणाई भरकटत चालली आहे, असे वारंवार निदर्शनास येत आहे. मात्र युवकांनी सजग राहून सायबर क्राईमला योग्य वेळी ओळखणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना गरज असते ती योग्य दिशा आणि आपल्या करिअरला आवश्यक असलेल्या गोष्टी इंटरनेटवरून अभ्यासण्याची. अलीकडे मात्र अनेकदा तरुणांची इंटरनेटवर फसवणूक केली जाते. अनेक युवतींना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण देखील केले जाते. अशावेळी युवाईने सायबर क्राईमबद्दल सजग असणे तेवढेच गरजेचे आहे. असे सांगत अमित गोते यांनी विविध स्पर्धा परीक्षांना आवश्यक असलेली मानसिकता आणि त्या दृष्टिकोनातून करावयाचा अभ्यास याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच महत्वाच्या टीप्स देखील विद्यार्थ्यांना दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रुपेश पाटील यांनी केले. दरम्यान उपस्थितांचा परिचय आणि विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात अकॅडेमीची होत असलेली वाटचाल याबद्दल संचालक महेंद्र पेडणेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा