– प्राचार्य श्रीजीतबाबू नयना
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सांगेली ता. सावंतवाडी येथील नवोदय विद्यालयात सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 6 वी व 9 वी वर्गात प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावेत असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्रीजीतबाबू नयना यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इयत्ता 6 वी साठी http://cbseitms.in/nvsregn/index.aspx या संकेतस्थळावर व 9 वीसाठी https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage या संकेतस्थळाचा वापर करावा. प्रवेश अर्ज नि:शुल्क असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईट वरील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घेवून संबंधीत शाळेतील मुख्याध्यापकांकडुन व्यवस्थीत भरुन घेवून ऑनलाईन अर्ज भरावा.हा अर्ज भरताना पालकांची सही व विद्यार्थ्याची सही व फोटो आवश्यक आहे.
इयत्ता 6 वीसाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षेस बसणारा विद्यार्थी सलग 3 री व 4 थी पास असावा व 5 वी मध्ये संपूर्ण वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिकणारा असावा. त्याचा जन्म 01.05.2008 ते 30.04.2012 पर्यंतचा असावा व त्याने 1509.2020 पूर्वी 5 वी मध्ये प्रवेश घेतलेला असावा. अन्यथा प्रवेश अर्ज अपात्र राहील. तसेच इयत्ता 9 वी साठी विद्यार्थी 8वी मध्ये शिकत असलेला पाहिजे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम तारीख 15.12.2020 पर्यंत असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. इयत्ता 6 वी साठी सदर परीक्षा 10.04.2021 रोजी व 9 वीसाठी 13.02.2021 रोजी होणार आहे.
प्रवेशा संबंधी अधिक माहितीसाठी 02363-242713 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा प्राचार्य श्रीजीतबाबू नयना 9428129201 व परीखा प्रमुख जे.बी.पाटील 9420294584 व एस.पी. हिरेमठ 9421340312 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्रीजीतबाबू नयना यांनी केले आहे.