You are currently viewing कणकवलीत “संपर्क से समर्थन”यात्रेत मोदी मोदी चा जय घोष

कणकवलीत “संपर्क से समर्थन”यात्रेत मोदी मोदी चा जय घोष

कणकवलीत “संपर्क से समर्थन”यात्रेत मोदी मोदी चा जय घोष

*भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी साधला थेट संवाद

*कणकवली बाजारपेठेतून निघाली मोदींना समर्थन देणारी हजारांची यात्रा,जनतेत दिसला मोठा उत्साह

कणकवली

भाजपच्या महा विजय 2024 संपर्क दौऱ्यात ‘संपर्क से समर्थन’ यात्रेत कणकवली शहरात मोदी …मोदी…असा एकच नारा घुमला. कणकवली शहरातील ढालकाठी ते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत निघालेल्या संपर्क यात्रेत प्रत्येक व्यक्तीशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. आपल्या मनातील पंतप्रधान कोण ? असा प्रश्न विचारला असता प्रत्येकाने नरेंद्र मोदी हेच आपल्या मनातील पंतप्रधान आहेत आणि आपल्याला ते कायम पंतप्रधान म्हणून लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर पंतप्रधान मोदी यांनाच आपण मतदान करणार आणि त्यांच्यासाठी येथील खासदार निवडून देणार असा संकल्प या वेळी कणकवलीच्या नागरिकांनी केला.
भाजपच्या महा विजय 2024 संपर्क यात्रा कणकवली शहरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. यावेळी भाजपा नेते, कुडाळ,मालवण प्रभारी माजी खासदार नीलेश राणे, भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आमदार प्रमोद जठार,माजी आमदार राजन तेली,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला जिल्हाध्यक्षा कोरगावकर ,संपर्क प्रभारी शैलेंद्र दळवी,प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,आदींसह स्थानिक पदाधिकारी जि. प.माजी अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवक जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, प्रज्ञा ढवण,कार्याध्यक्ष संजना सावंत,संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, मनोज रावराणे,राजन चिके,बाळा जठार,समीर सावंत,बाबा परब, विठ्ल देसाई,समीर prbhu गावकर,अण्णा कोदे, हर्षदा वाळके,यांच्या सह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा