पारपोली येथे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते “फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन
सावंतवाडी
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पारपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवाचा शुभारंभ उद्या होणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्य संस्कृतीचा लाभ घेण्यासोबत पारंपारिक कला पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पर्यटकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, कोल्हापूर वनवृत्त मुख्यवनसंरक्षक आर. एस. रमानुजम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा महोत्सव सावंतवाडी वनविभाग आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. पारपोली येथे फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध आहेत. त्यामुळे सुमारे १८० हून अधिक विविध प्रकारची फुलपाखरे या गावात आढळतात. यातील फुलपाखरांच्या बहुसंख्य प्रजाती ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या पारपोली गावात आढळून येतात. त्यामुळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*