You are currently viewing सावंतवाडीत रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट अभिवादन कार्यक्रम..

सावंतवाडीत रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट अभिवादन कार्यक्रम..

सावंतवाडीत रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट अभिवादन कार्यक्रम..!

सावंतवाडी :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका न्यायालयीन कामासाठी 22 ऑक्टोबर 1932 रोजी सावंतवाडी संस्थांनाला दिलेल्या भेटीला येत्या रविवारी 91 वर्षे पूर्ण होत असल्याने समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या वतीने स्मृती प्रबोधन जागर तथा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सावंतवाडी भूमीत सावंतवाडी नगरपालिकेने उभारलेल्या स्मृती उद्यानात हा कार्यक्रम सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 असा आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रसिद्ध साहित्यिक व आंबेडकरी चळवळीतील विचारवंत कवी अजय कांडर यांचे “बाबासाहेब समजून घेताना” या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे तर कार्यक्रमाला गोव्याचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माटे, कै. टिपको पडवेकर यांचे वारसदार संजय कदम पडवे, राजेंद्र कदम मालवण, वाय. जी. कदम वेंगुर्ला, संतोष कदम वैभववाडी, सुरेश जाधव दोडामार्ग, अंकुश कदम व भावना कदम इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर हे राहणार आहेत.

दुपारच्या दुसऱ्या सत्रात “फुले शाहू आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी सांस्कृतिक प्रतीकाची गरज आहे का?” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये कवी राजेश कदम, सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर जाधव, रवी जाधव, कांता जाधव, शांताराम असनकर, मीनाक्षी जाधव, वासुदेव जाधव, चंद्रशेखर जाधव, अनंत कदम हे सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवी विठ्ठल कदम हे राहणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा