*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देवी कुष्मांडा*
नवरात्रीची चौथी माळ, चला जाऊ देवीच्या दर्शनाला ।
देवी सिंहारूढ, भुजा आठ, म्हणुनी म्हणती अष्टभुजा तियेला॥१॥
एका हाती चक्र, दुसऱ्या हाती पद्म, तिसर्यात धनुष्य, चौथ्या करात बाण
गदा धारण पाचव्या हाती, सहाव्यात अमृत कलश ॥२॥
सातव्या हाती कमंडलु, आठव्यात जपमाळ करी धारण
अति तेजस्वी रुप हिचे, कारण सूर्यमंडळी हिला स्थान॥३॥
तशीच ती प्रेमळ, म्हणूनी प्रसन्न होते लवकर
अशा अष्टभुजेचा, कुष्मांडा देवीचा करू उदो उदो उदो ॥४॥
उदे ग अंबे, उदे ,उदे,। उदे, उदे ग अंबे उदे
सुख, समृद्धी, यश कीर्ति दात्र्या कुष्मांडाचा बोला उदे, उदे॥५॥
विद्या रानडे