*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सौ.अर्चना मायदेव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घट स्थापना*
आत्म्याचा करुनी घट
त्यात स्थापिले तुझेच रूप
आरती तेजाची करुनी
पाहिले अरुपाचे सरूप
तोरण बांधले सत्वा चे
त्यात कर्माचे ओविले फुल
बंध घातला मनाच्या उंबरा
त्यात राखिले मी स्वकुल
काम क्रोधासी दंडून
करेन आनंदी समाज
तुजप्रत भक्ती ठेवून
ऐसा जोगवा मागते आज
सत्य अहिंसा न्यायाचा
जोगवा मागते मी दरबारी
ठेव सुरक्षित माता भगिनी
स्त्री शक्तीची द्योतक नारी
माता अंबा महालक्ष्मी तू
तशीच दुर्गा भुवनेश्वरी
निलांबरी तू कालिमाता
पुण्य नगरीची जोगेश्वरी
सौ. अर्चना मायदेव
पुणे