आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही; माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांची माहिती
सावंतवाडी
तळवणे येथील रुपेश जनार्दन पोळजी (वय ३२) या युवकाने मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांनी दिली आहे. रुपेशच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबतची खबर पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.