You are currently viewing मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. वाहतूक पुर्ववत करण्यात यावी..

मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. वाहतूक पुर्ववत करण्यात यावी..

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आगार व्यवस्थापकांना निवेदन..

मालवण
ग्रामीण भागातील वयोवृद्ध व सामान्य नागरिक यांची ये-जा करण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता आणि इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून यासाठी मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. वाहतूक पुर्ववत करण्यात यावी. तसेच एस.टी. च्या दैनंदिन फेऱ्यांबाबत वेळापत्रकाची प्रसिद्धी बसस्थानकात फलकाद्वारे करावी. तरी दैनंदिन वेळेनुसार एस.टी. बस सुरु व्हाव्यात, जेणेकरुन एस.टी. प्रवाशांचे हाल होऊ नयेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपजिल्हाध्यक्ष मिलींद घाडगे यांनी मालवण आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, माजी ग्राहक संरक्षण अध्यक्ष रमण वाईरकर उपस्थित होते. आगार व्यवस्थापकांनी आपल्या मागणीचे प्राधान्याने विचार करू असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा