You are currently viewing मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे – प्रा. डॉ. एम एस देशमुख

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे – प्रा. डॉ. एम एस देशमुख

श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयात बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळा संपन्न

 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा इतिहास, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमधील बदललेल्या अभ्यासक्रमाशी संबंधित होती. सामाजिक सुधारणा चळवळींचा इतिहास, सहकार, श्रमाचे अर्थशास्त्र, या वैकल्पिक विषयांसाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये बदललेल्या अभ्यासक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे भविष्यात फक्त नोकरी मागणारे विद्यार्थी तयार न होता नोकरी देणारे विद्यार्थी घडवायचे आहेत आणि ते या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शक्य होणार आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे मत शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखांचे प्रमुख प्रो. डॉ.एम एस देशमुख यांनी व्यक्त केले. या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयाचे शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी प्राध्यापकांनी आपल्या क्षमतांचा विकास करणे गरजेचे आहे. आज जागतिक स्तरावर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विविध कोर्सेस त्यांनी स्वतः तयार केले पाहिजेत असे मत प्रो डॉ एम एस देशमुख यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी आपण शिकलेला अभ्यासक्रम, सध्या शिकवत असणारा अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे बदललेला अभ्यासक्रम यांच्यातील तफावत विविध उदाहरणांनी स्पष्ट केली. नवीन अभ्यासक्रम असा तयार करण्यात आला आहे की ज्यामुळे विद्यार्थी हा फक्त शिकणार नाही तर तो सामाजिक दृष्ट्या सक्षम होईल, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे माणसाचे माणसाशी असणारे नाते अधिक बळकट होणार आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रा. डॉ. जे एस इंगळे, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्रो डॉ अर्चना जगतकर,अध्यक्ष, समाजशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून इतिहास या विषयासाठी डॉ संदीप जाधव, डॉ श्रीधर शिंदे, डॉ कविता गगराणी, डॉ आरती नाडगौडा यांनी मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विषयासाठी डॉ.प्रभाकर माने, डॉ. मनोहर कोरे, डॉ. संतोष यादव यांनी मार्गदर्शन केले तर समाजशास्त्र विषयातील विषय तज्ञ म्हणून डॉ. वसंत मोरे, प्रा. अखिलेश शिंदे, डॉ.शाहू गावडे, डॉ. सतीश देसाई, डॉ.अर्जुन जाधव,डॉ. धनाजी पाटील, डॉ. प्रभाकर निसर्गंध,डॉ. विनोद कुंभार, यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेचा समारोप समारंभ मिनलबेन मेहता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ सतिश देसाई, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जवळ जवळ १०५ हून जास्त प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.त्यामुळे ही कार्यशाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ धीरज शिंदे यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ संपदा टिपकुर्ले यांनी करून दिली. महाविद्यालयातील अर्थशास्त्र,इतिहास आणि समाजशास्त्र विभागातील श्री रत्नपारखी, डॉ राजश्री मालेकर, स्वप्निल वाकडे, श्री संभाजी निकम, पवनकुमार भोसले या सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींनी या कार्यशाळेचे संयोजन केले.सूत्रसंचालन प्रा.वर्षा पोतदार आणि संदिप पाटील यांनी केले तर आभार प्रा.किरण कानडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध प्राध्यापक,सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा