*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवरात्र*
आला उत्सव मोठा
नऊ दिवस नवरात्र
चला साजरा करुया
करु जागर नऊ रात्र
शारदीय नवरात्रीला
देवी उपासना भक्तीभाव
असूर शक्तीचा नाश कर
विणवू भक्ताला पाव
करूया घटस्थापना
आई देवीचे पूजन
भक्ती भावे आनंदे
गाणे आरत्या गायन
पहिली माळ गळ्यात
नागवेलच्या पानांची
मुखशुद्धी आरोग्य रक्षण
कफ वात पित्त रोग नाशाची
नारंगी वस्त्र नेसवून
करू श्रृंगार सोळा
रास गरबा खेळूनी
आनंदे उत्सव सोहळा
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.