You are currently viewing टार्गेट ठेऊन जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करा – वरुण सरदेसाई

टार्गेट ठेऊन जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करा – वरुण सरदेसाई

*टार्गेट ठेऊन जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करा – वरुण सरदेसाई*

*कणकवलीत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी घेतली शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक*

शिवसेना पक्षाने २०१८ साली प्रथमच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करून थेट लढत दिली. त्यावेळी आपण मतदार नोंदणीत लक्ष घातले नव्हते तरी देखील फार कमी मतांच्या फरकाने आपला पराभव झाला होता. मात्र यावेळी आपल्याला या निवडणुकीत विजय खेचून आणायचा आहे त्यासाठी आपल्याला पदवीधरांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे.६ नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. शिवसेना युवासेना, महिला आघाडीच्या प्रत्येकाने एकत्रितरित्या या निवडणूकीत सहभागी होऊन टार्गेट ठेऊन जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करावी असे आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.

आगामी कोकण पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शनिवारी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचे कणकवलीत जोरदार स्वागत केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गीतेश राऊत,रुची राऊत,तालुकाप्रमुख शैलेश भोगले,मंगेश लोके,जयेश नर, कन्हैया पारकर, महिला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर,दिव्या साळगावकर,प्रदीप नारकर, निनाद देशपांडे, स्वप्नील धुरी,उत्तम लोके,गणेश गावकर,अतुल सरवटे, रूपेश आमडोस्कर,तेजस राणे, धीरज मेस्त्री, नितेश भोगले,सिद्धेश राणे,सचिन आचरेकर आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा