सावंतवाडी:
तळवडे आंबाडेवाडी येथील श्री पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त सोमवार १६ ते २१ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार १६ रोजी सायंकाळी ७ ते १० पर्यंत भजनांचा कार्यक्रम यामध्ये भूतनाथ भजन मंडळ,निरवडे ईसवटी पंचदेवी भजन मंडळ,न्हावेली पाटेकर गोठण भजन मंडळ,तळवडे त्यानंतर रात्री १० ते १२ पर्यंत फुगडी व दांडिया यामध्ये जय गणेश दांडिया ग्रुप,माजगाव तांबळीश्वर भगवती दांडिया ग्रुप,वेंगुर्ला त्रिमूर्ती दांडिया ग्रुप,वेंगुर्ला यांचा सहभाग आहे.
मंगळवार १७ रोजी भूतनाथ भजन मंडळ,निरवडे सिद्धेश्वर उद्धीन्नाथ भजन मंडळ,तळवडे गोठण भजन मंडळ,वजराट त्यानंतर धनलक्ष्मी फुगडी ग्रुप,होडावडा थळकर दांडिया ग्रुप,तळवडे श्री देव ब्राम्हण दांडिया ग्रुप,रेडी उत्कर्ष दांडिया ग्रुप,वेंगुर्ला
बुधवार १८ रोजी रात्री ८ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ,सिंधुदुर्ग यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ भेद कुष्मांडाचा महिमा टेंबलाईचा ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
गुरुवार १९ रोजी रात्री ८ वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ,इन्सुली यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ मायाप्रलय ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
शुक्रवार २० रोजी रात्री ८ वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळ,आजगाव यांचा ‘आई कुलस्वामीनी भगवती’ शनिवार २१ रोजी रात्री ८ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ,मोचेमाड यांचा ‘ महिमा लक्ष्मीदेवीचा ‘हा नाट्यप्रयोग होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजाराम गावडे यांनी केले आहे.