You are currently viewing शिरोडा – वेळागर वाडीच्या अन्यायग्रस्तांसाठी उपरकरांनी ठोकला ‘मनसे’ शड्डू

शिरोडा – वेळागर वाडीच्या अन्यायग्रस्तांसाठी उपरकरांनी ठोकला ‘मनसे’ शड्डू

शिरोडा – वेळागर वाडीच्या अन्यायग्रस्तांसाठी उपरकरांनी ठोकला ‘मनसे’ शड्डू

शेतकऱ्यांच्या या लढ्यात पूर्ण पाठीशी असल्याचे परशुराम उपरकर यांनी केले जाहीर

वेंगुर्ला

तालुक्यातील शिरोडा – वेळागर वाडीच्या अन्यायग्रस्तांसाठी उपरकरांनी ‘मनसे’ शड्डू ठोकला आहे. शिरोडा – वेळागर वाडीत माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकरांनी अन्यायग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. वेळागर वाडीतील ९ हेक्टर जागा वगळण्यासाठी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर शेतकर्‍यांना साथ देऊन या लढ्यात पूर्ण पाठीशी असल्याचे जाहीर केले. शेतकर्‍यांची शासनाने हस्तांतरित केलेल्या जागेतून ९ हेक्टर जागा सोडण्याची मागणी सर्वे नं .३१/३२/२९/३०/७/ हे सर्वे नंबरवर शेती, बागायती व घरे असल्याने त्यांचे गावठाण सोडणे गरजेच आहे. त्यावर वेळागरवाडीतील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. तसेच अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी यांनी जागा संपादित केली गेली असली तरी आमच्या जमिनी न सोडल्यास एक इंच जागा शासनाला देणार नसल्याचे स्पष्ट केले व या लढ्यात मनसेने आपली साथ द्यावी, अशी मागणी केली. तर या संपूर्ण लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पाठीशी असून पूर्ण ताकतीने उभे राहू, अशी ग्वाही श्री उपरकर यांनी दिली.

तब्बल ३२ वर्षापूर्वी संपादित केलेली जागा ही शासनाने शेतकर्‍यांना विश्वासात न घेता सर्वे केला होता शेती बंधारा बांधण्यासाठी शासनाने जबरदस्ती केली व आताच्या नियमाने १२ वर्षांनंतर कुठलाही प्रकल्प नाही झाला नसल्याने तर हस्तांतरित केलेली जमीन शेतकर्‍यांच्या ताब्यात देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ह्या संपूर्ण जागेची माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शेतकऱ्यांसमवेत पाहणी करत यानंतर शेतकऱ्यांसमवेत बैठक घेत सर्व कागदपत्रांची पाहणी करून श्री. उपरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, वेंगुर्ला माजी तालुकाध्यक्ष सनी बागकर. सचिव आबा चिपकार, निलेश देसाई, विशाल बर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, सदर प्रकरणात ना.स. फरांदे व टेंबुडे या समितीने शेतकर्‍यांच्या बाजूने अहवाल दिला आहे आणि शेतकऱ्यांनी एकही इंच जागा शासनाला देणार नसल्याचे सांगितले. ह्या संपूर्ण लढ्यात मनसे पूर्णपणे पाठीशी असल्याचे उपस्थित श्री. उपरकर व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, शेतकरी आजु अमरे, राजू आंदुर्लेकर, हनुमंत गवंडी, मनोहर नाईक, गैरीज अमरे, उत्तम आरोस्कर, महेंद्र गावडे, चंद्रकांत नाईक, उदय आंदुर्लेकर, प्रवीण आरोस्कर, आनंद अमरे, सुरज अमरे, दीपा अमरे भानुदास गवंडी, दीपक खोत, जगन्नाथ आंदुर्लेकर, आदित्य गवंडी, दादा आरोस्कर, गजा गवंडी, राजेश नाईक, विश्वनाथ आरोस्कर, रूजारीय आलफान्सो, विजय आरोस्कर, दिलीप गवंडी, बाळा आरोस्कर, काका आरोस्कर, शंकर नाईक, बाबी रेडकर, सूरज अमरे, संतोष आरोस्कर, महिमा नाईक उर्मिला आंदुलेकर, भाग्यश्री गवंडी, शारदा आरोस्कर, अस्मिता आरोस्कर, पूनम कावळे, शामली केरकर, शैला गवंडी, स्नेहा आरोस्कर, सुशमा आरोस्कर, राजश्री आंदुर्लेकर, मंजीली रेडकर, कुमुदिनी गवंडी आदी शेतकरी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा