मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, योजनांचे महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी पोर्टलवरील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज भरणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्याच्या प्रक्रियेस दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यानी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ति योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व नुतनीकरण करणेबाबत अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यानी ऑनलाईन पध्दतीने महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरण्यासठी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी. जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यानी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र विद्यार्थ्याचे ऑनलाईन भरण्यासंदर्भात कार्यशाळा घेवून परिपत्रक शाळा, महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात लावण्यात यावी.
विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यायाची राहील. तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज एक महिन्याच्या आत वेळेवर भरुन घेण्याबाबत व महाविद्यालय स्तरावर अर्जाची छाननी करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वेळेवर पाठविण्याबाबत महाविद्यालयायंना सूचित करण्यात येत आहे. या योजनेपासून मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*