*डॉक्टर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सदस्य कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्न.. भास…!*
कुणास कळला…
मार्ग सुखाचा…?
अख्खा गेला…
जन्म लोकांचा…!
दु:खाने छळले ते…
हृदयी दाटले किती…!
श्वास इथे थांबते…
सुख कुठे सोबती…!
अंतरात माझ्या…
दु:खाचे मिलन…!
मिलनात सुखाच्या…
दुभंगते जीवन…!
अंत… कसा हा
न कळत झाला…!
दु:खास पहा
स्वप्न भास झाला…!
………………………….
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि. बुलढाणा