*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवी कविता आणी कवित्व*
कविता नसते सोप्पी
त्याला लागते कवित्व
कवी असतो जादूगार
असे शब्दांचे प्रभुत्व
कवितेत रमायला
कविलाच फक्त जमते
वाचक रमवण्याची
कला कवीकडे असते
कवित्व हे महत्वाचे
त्यातून कविता जन्मते
मनाच्या या अंधाराला
प्रकाशमान ती करते
कवी कविता कवित्व
हे एकमेकांत गुंफलेले
भावनांच्या डोहामध्ये
सदा रममाण झालेले
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक