You are currently viewing मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी:

 

मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भरगच्च सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समिती अध्यक्ष संजू परब यांनी दिली.

रविवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना होईल. सायंकाळ पासून परबवाडी, रेडकरवाडी, देऊळवाडी व डीगवाडी मंडळांची भजने होतील. सोमवार १६ रोजी रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब पुरस्कृत गोवा व सिंधुदुर्गातील नामांकित ग्रुपचा दांडिया होईल. यात भूमिका आराध्या दांडिया ग्रुप कोरगाव, श्री देव रवळनाथ दांडिया ग्रुप तळर्णा व श्री थळकर दांडिया ग्रुप तळवडे यांचा समावेश आहे. तसेच पावशी कुडाळ येथील सखी फुगडी संघाचा सदाबहार फुगडीचा कार्यक्रम होईल.

मंगळवार १७ रोजी संध्याकाळी ७ वा. स्थानिकांचे भजन व ९ वा. जय हनुमान पारंपरिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. बुधवार १८ रोजी सायंकाळी भजन व रात्री ९ वाजता चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. गुरुवार १९ रोजी संध्याकाळी ५ वा. देऊळवाडीतील महिलांची फुगडी, ७ वा. भजन व रात्री ९ वा. पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होईल.

शुक्रवार २० रोजी संध्याकाळी भजन, ८ वा. महिलांसाठी पैठणी कार्यक्रम व ९ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होईल. शनिवार २० रोजी संध्याकाळी ७ वा. श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव, ८.३० वा. श्री देव सावंतवस भजन मंडळ इन्सुली व १० वा. डीगवाडी ग्रामस्थ भजन मंडळाचा कार्यक्रम होईल.

रविवार २१ रोजी रात्री ८ वाजता सौ. संजना परब पुरस्कृत महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम होईल. विजेत्यास १० हजार रुपये किमतीची पैठणी व उपविजेतीस ५ हजार रुपयेची पैठणी देण्यात येईल. १०.३० वाजता लकी ड्रॉ सोडत व स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल. दुसर्‍या दिवसापासून दररोज दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी कार्यक्रमांसह श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संजू परब व सचिव संतोष परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा