You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या कामाचे पोटशूळ असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही

आ. वैभव नाईक यांच्या कामाचे पोटशूळ असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही

*आ. वैभव नाईक यांच्या कामाचे पोटशूळ असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही*

*शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची टीका*

कुडाळ ते मुंबई जाणाऱ्या शयनयान एसटी बस सेवेची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी.त्याची जाहिरात व्हावी आणि हि सेवा निरंतर सुरु रहावी, एसटीचे उत्पन्न वाढावे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी आमदार या नात्याने वैभव नाईक यांनी शयनयान बस चालविली होती. त्या बसमध्ये प्रवासी बसलेच नव्हते. आणि त्यांनी हि एसटी बस कुडाळ डेपोच्या आवारातच आणि अगदी कमी वेगात चालविली होती. भाजप पदाधिकारी ज्याप्रमाणे टीका करत आहेत ते केवळ आमदार वैभव नाईक यांच्या द्वेषापोटी करत आहेत. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मध्ये होत असलेली विकास कामे आणि जनतेचा त्यांना मिळणारा पाठींबा याचा पोटशूळ भाजप पदाधिकाऱ्यांना असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची गेले चार दिवस दडपशाही सुरु आहे.अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, आ. वैभव नाईक हे ५० खोक्यांसाठी भाजप आणि शिंदे गटात गेले नाहीत.ईडी सीबीआय, एसीबी कारवाईला ते घाबरले नाहीत. म्हणून आता त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सूरु आहे. मात्र वैभव नाईक हे बाळासाहेब ठाकरे , उद्धवजी ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत. एसटी चालविली म्हणून एखादा गुन्हा दाखल झाला तरी त्यांना त्याची कोणतीही फिकीर नाही. ते चौकशीला घाबरणारे नाहीत आणि चौकशी लागली तर आम्ही सर्व कार्यकर्तेही आ. वैभव नाईक यांच्यासोबत चौकशीला सामोरे जाऊ.त्याचबरोबर एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी भाजप पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील एकमेव कुडाळ तालुक्यातील कुडाळ आणि ओरोस या बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले. मालवण येथील बसस्थानकाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात इतर कुठेही बसस्थानकांचे काम झाले नाही हि वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ डेपोसाठी नुकत्याच नवीन ९ एसटी बस दाखल झाल्या आहेत. आता कुडाळ ते मुंबई हि शयनयान (स्लीपर) बस सेवा सुरु झाली आहे. याचेही श्रेय आ. वैभव नाईक यांचेच आहे. प्रत्येक विभागाचा निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात आणला आहे. याचीच धास्ती भाजपने घेतली असून भाजप पदाधिकाऱ्यांना जळी -स्थळी-काष्टी वैभव नाईकच दिसत आहेत असा घणाघात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केला आहे.

*संवाद मीडिया*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*भारत गौरव ट्रेनने* चला, *तिरुपती, रामेश्वरम् , मदुराई कन्याकुमारी आणि तिरुअनंतपुरम.*

*श्री रामेश्वरम – तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’* लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये
रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन दि. 17/11/23 ते 25/11/23
8 रात्र आणि 9 दिवस

प्रवास खर्च फक्त:-
Package Category Package Price
Economy (SL) ₹ 15,550
Comfort (3AC) ₹ 27,850
Comfort (2AC) ₹ 33,800

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
17/11/23 मुंबई CSMT प्रवास सुरुवात.
18/11/23 रेनिगुंटा येथे आगमन. *तिरुपती बालाजी मंदिर* दर्शन (बालाजी दर्शन तिकीट स्वतः ऑनलाईन बुक करून घ्यावे लागतील). ( रात्रि रेणिगुंटा येथे मुक्काम )
19/11/23 सकाळी न्याहारी नंतर, देवी *पद्मावती मंदिर* दर्शन करून मदुराई कडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
20/11/23 मदुराईला आगमन आणि रोडद्वारे रामेश्वरम् कडे प्रस्थान , *रामनाथस्वामी मंदिर दर्शन आणि धनुष्कोडी* करून रात्री रामेश्वरम येथे मुक्काम.
21/11/23 रोड द्वारे मदुराई कडे प्रस्थान , *मीनाक्षी मंदिर* दर्शन, नंतर नागरकोइल जाण्यासाठी ट्रेनने प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
22/11/23 नागरकोइल स्टेशनवर आगमन आणि रस्त्याने कन्याकुमारीकडे प्रस्थान, *विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारी मंदिर आणि गांधी मंडपमला* भेट द्या, सनसेट पॉइंट. (कन्याकुमारी येथे रात्रभर मुक्काम.)
23/11/23 सकाळी त्रिवेंद्रम कडे प्रस्थान, *श्री पद्मनाभस्वामी मंदिर* दर्शन आणि कोवलम बीच. संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
24/11/23 ट्रेनच प्रवास.
25/11/23 टूर समाप्त.

*बोर्डिंग आणि डी बोर्डिंग* *पॉइंट्सः* मुंबई CSMT, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापुर, कलबुर्गी.

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) 3AC Comfort Category – 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) 2AC Comfort Category – 2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

☎️ *7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112321/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा