You are currently viewing सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांत होणार जागरूकता – पोलीस अधीक्षक अग्रवाल यांचा उपक्रम 

सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांत होणार जागरूकता – पोलीस अधीक्षक अग्रवाल यांचा उपक्रम 

सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांत होणार जागरूकता – पोलीस अधीक्षक अग्रवाल यांचा उपक्रम

१६ ते २७ ऑक्टोबर कालावधीत २२० विद्यालयात राबविणार उपक्रम..

ओरोस

सिंधुदुर्ग पोलीस व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम के सी एल), सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात “सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस” उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पोलीस काका, दिदी, जागरुक नागरीक, तसेच स्टुडंट पोलीस केडर या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, नागरीक यांचेत जागरुकता आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२० माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्य शासनाने कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पोलीस काका, दिदी, जागरुक नागरीक, तसेच स्टुडंट पोलीस केडर या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, नागरीक यांचेत जागरुकता आणण्यासाठी वेळोवेळी उपक्रम राबविणेबाबत सूचित केलेले आहे. तसेच ऑनलाईन फसवणुकीचे वाढते प्रमाण कमी करण्याकरीता सायबर सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथील विद्यार्थ्यांना “सायबर सुरक्षाबाबत” अवगत करण्यासाठी जागरुकता निर्माण करुन सायबर गुन्हयापासून त्यांचेसह त्यांचे परीवाराचा बचाव करण्याचे दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे संकल्पनेतून सिंधुदुर्ग पोलीस दल व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे 16 ऑक्टोबर 2023 ते 27 ऑक्टोबर 2023 मुदतीत “सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस या विषयावर मार्गदर्शन करणार असून, त्यात सिंधुदुर्ग जिल्हयातील 220 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रत्यक्ष जावून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात जिल्हयातील 13 पोलीस ठाणी, सायबर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा व मानव संसाधन शाखा यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी होणार आहेत. सायबर गुन्हेगार गुन्हे करताना वापरणाऱ्या क्लृप्त्या पद्धतीबाबत पोलीस दलाकडुन माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी कार्यक्रमाच्या सांगता समारंभास पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल हे मार्गदर्शन करणार आहेत.

14 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत जिल्हयातील सर्व सायबर कॅफे व संगणक संस्था यांचे चालक यांची बैठकदेखील जिल्हा होमगार्ड कार्यालय, सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस उपअधीक्षक के एल सावंत यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*

होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗

*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*

☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️

डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..

– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali

*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा