*सूरज पाटील यांनाही अटक होणार..?*
सावंतवाडी :
सावंतवाडीचे सहा.पोलीस निरीक्षक सागर खंडागळे हे एक लाख रुपयांची लाच स्विकरताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. ही कारवाई आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
अधिक माहिती नुसार सावंतवाडी येथील बिल्डर सिद्धांत परब यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या बाबत लाच मागितल्या प्रकरणी तक्रार केली होती. रायगड लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून सापळा रचून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहा. पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना रंगेहाथ पकडले. याच लाच प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे दुसरे अधिकारी पीएसआय सूरज पाटील यांना देखील ताब्यात घेतले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजले असून त्यांच्या सोबत आणखी काही अधिकारी सुद्धा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या दोन बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात भूकंप झाला असून सिंधुदुर्ग पोलिसांबद्दल सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा रंगत असल्याच्या दिसून येत आहेत.