सिंधुदुर्गनगरी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची औरंगाबाद येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बदली करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी डॉ.चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता.त्यामुळे हि बदली करण्यात आल्याचे समजते. दोन महिन्यानपूर्वीच डॉ. धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर डॉ. चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक या पदावर रुजू झाले होते.