NGF चा राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळा
शनिवारी पार्ल्यात पुस्तक साजरा
मुंबई
विलेपार्ले (पूर्व) येथील, लोकमान्य सेवा संघ पु. ल. देशपांडे सभागृहात. नूतन गुळगुळे फाउंडेशनचा
राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती गौरव सोहळा 2023 शनिवारी सात ऑक्टोबरला कौतुकाच्या प्रेरणादायी अश्रूंनी भरून संपन्न झाला. आठ विभागांमध्ये हे दिव्यांग गौरव पुरस्कार देण्यात आले होते. त्यात वैयक्तिक पुरस्कार, मायलेकी पुरस्कार, दिव्यांग संस्था पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार असे महत्वपूर्ण पुरस्कारांचा समावेश होता.
हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी सामाजिक, बँकिंग, संरक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यामध्ये शौर्यचक्र विजेते कमांडो मा. श्री मधुसुधन सुर्वे, अध्यक्षा एन के जी एस बी बँक मा. सौ हिमांगी नाडकर्णी, निमंत्रक : NGF संस्था अध्यक्षा नूतनताई विनायक गुळगुळे, विनायक गुळगुळे, पुष्कर विनायक गुळगुळे हे सर्व मान्यवर व्यासपीठावर होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. प्रकाश बाबा आमटे, आणि मा. डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे हे पूज्यनीय दैवी दांपत्य उपस्थित होते. अतिशय उत्साही वातावरणात दिव्यांगांचा गौरव करण्यात आला.
मंदाकिनी आमटे, प्रकाश आमटे यांनी सांगितले. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग समाज बांधवांसाठी सामाजिक कार्य सुरू केले त्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली. बाबांनी सुद्धा दिव्यांग व्यक्तींसाठी
सेवा कार्य सुरू केले होते. ते आजही सुरू आहे.
सुदृढ समाज मनाच्या जाणिवा अजूनही जागृत आहेत म्हणूनच आपण नूतन गुळगुळे फाउंडेशनचा हा दिव्यांग गौरव पुरस्कार अनुभवतो आहे.
कमांडो मा. श्री मधुसुधन सुर्वे, म्हणाले. मला इथे येऊन मोठे समाधान मिळाले आहे. सैनिकी क्षेत्रात मोठे आव्हानात्मक कार्य आम्हाला करावे लागते पण जीवनभर आपल्या अपंगत्वावर संघर्ष करून जीवनाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणे हे कठीण आहे. सुर्वे यांच्या पायाला एका सैनिकी मिशन दरम्यान अकरा गोळ्या पायात शिरल्या त्यामुळे त्यांचा एक पाय स्वतःच्या हाताने त्यांनाच कापावा लागला. यानंतर त्यांना वैद्यकीय मदत मिळाली. आता ते आर्टिक्युशन पायाने यथार्थ आणि कृतार्थ जीवन जगत आहेत. 2026 मध्ये त्यांच्या जीवनावर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
त्यांच्या प्रत्येक संवादी शब्दातून आत्मविश्वास झळकत होता.
हिमांगी नाडकर्णी यांनी नूतनताई व विनायक गुळगुळे यांचे कौतुक केले. संघर्षमय परिस्थितीत सेलेब्रल पाल्सी असणाऱ्या आपल्या पुष्करला वैद्यकीय मदत व शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. आणि त्याने सुद्धा त्याची जिद्द कायम ठेवली. म्हणून या कुटुंबाला हे घवघवीत यश मिळाले. या सर्व प्रमुख पाहुण्यांनी नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या स्वानंद सेवासदन वास्तु उभारण्याच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. ग्रामीण गरीब दिव्यांग मुला मुलींना व त्यांच्या पालकांना निवास व प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. या कार्याला अनेक मान्यवरांनी हातभार लावलेला आहे याचेही कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी पुरस्कारार्थी दिव्यांगांनी संस्थेविषयी समाधान व्यक्त केले. “स्वयंभू-निनाद” श्री निनाद आजगावकर यांच्या सुरेल गाण्यांची मैफिल, कार्यक्रमाच्या सुरुवातीला रंगली होती. आजगावकर यांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.
गेल्या आठ वर्षात या संस्थेने जवळजवळ साठ दिव्यांगांना हे पुरस्कार दिले आहेत. जनमानसात बहुविकलांगांनविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी. म्हणून हा पुरस्काराचा यज्ञ फाउंडेशनने सुरू ठेवला आहे, असे नूतन ताईंनी सांगितले व अपंगांविषयीचे प्रश्न लोकांसमोर मांडले. त्या प्रश्नावर पुढील काळात आता काम सुरू होईल असा विश्वास नूतन ताई आणि प्रत्येकांनी व्यक्त केला. अपंग कायद्यांचा यथायोग्य उपयोग पोलिसांनी करावा कारण कुठल्याही दिव्यांगांवर सुदृढ व्यक्तीकडून अन्याय होऊ नये याची काळजी पोलिसांनी घ्यावी. त्याकरता पोलीस यंत्रणा सिद्ध व्हावी. अशी इच्छा नूतन ताईंनी व्यक्त केली. स्वानंद सेवा सदन या इमारतीला सर्व दिव्यांग सेवकांनी मदतीचा हात दिला आहे आणि अजूनही दिला पाहिजे, यासाठी ताईंनी जोर दिला. कारण इमारत तयार झाल्यावर दिव्यांगांच्या सोयी सुविधेसाठी भरीव मदतीची आणखी गरज लागणार आहे. त्यामुळे दिव्यांग सेवकांनी सिद्ध होऊन समाजात या कार्याची माहिती लोकांना द्यावी. असे नूतन ताईंनी आवर्जून सांगितले. संस्थेला मदत करणाऱ्या दानशुर व्यक्तींना “80G” व “CSR- 1” अंतर्गत आयकरात सवलत मिळेल. या कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले. आपल्या सूत्रसंचालनातून त्यांनी दिव्यांगांची भावना प्रेक्षकांच्या मनात पोचवली. अशाप्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. पार्लेकरांनी या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. अशी माहिती नूतन गुळगुळे फाउंडेशनचे ठाणे शहर विश्वस्त पत्रकार लेखक एडवोकेट रुपेश पवार यांनी दिली.
NGF संस्था
9930852165
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*