You are currently viewing कोकण पदवीधर मतदार संघासाठी पदवीधरांनी नोंदणी करावी

कोकण पदवीधर मतदार संघासाठी पदवीधरांनी नोंदणी करावी

कोकण पदवीधर मतदार संघासाठी पदवीधरांनी नोंदणी करावी…

मालवण तहसीलदारांचे आवाहन ; ६ नोव्हेंबर अंतिम मुदत

मालवण

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत सुरु आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०२० पूर्वी पदवी शिक्षण पूर्ण झालेले व्यक्ती मतदार म्हणून नाव नोंदणी करु शकतात. तरी तालुक्यातील अशा व्यक्तीनी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी पात्र पदवीधर मतदाराचे वय १८ पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तो मतदार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेचा पदवीधर आवश्यक आहे. मतदार नोंदणी करताना नमुना नंबर १८ भरणे आवश्यक आहे. त्यासोबत एक पासपोर्ट साइज कलर फोटो, पदवी गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड किंवा लाईट बिल, नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा पॅनकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. नमुना-१८ सोबत सादर करण्यात येणारे पुराव्याचे कागदपत्र हे पदवीधर मतदारांनी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वयंसाक्षांकीत करुन अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करुन घ्यावेत.
यासाठी मतदार नोंदणी अधिकारी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी पालिकेचे मुख्याधिकारी
संतोष जिरगे व गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांची अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरी पदवीधर मतदार निवडणूकीकरीता मतदार नोंदणी करणाऱ्या मतदारांनी मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या समक्ष मूळ कागदपत्रे दाखवून त्यांच्या झेरॉक्स प्रती सत्यप्रत करुन घेणे आवश्यक आहे. तसेच पात्र मतदार हे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org/ या संकेतस्थळावर मतदार नोंदणी करु शकतात. पदवीधर मतदार नोंदणीकरीता आवश्यक नमुना १८ तहसिल कार्यालय येथील निवडणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत, तरी पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार श्रीमती झालटे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा