मुंबई
सावंतवाडी तालुक्यातील ” बांदा नवभारत शिक्षण प्रसारक” मंडळ,मुंबईच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री.उल्हास बाबाजी देसाई यांचा ६० वा वाढदिवस आज मंगळवार दि. १ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे नवभारत विद्यालयात संस्थेच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा केला. त्यावेळी शिक्षण महर्षी मा.आबासाहेब तोरस्कर व सचिव मा.विजय सावंत व संस्थेचे अन्य कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या सदस्या सौ.कल्पना तोरस्कर, डॉ.मिलिंद तोरस्कर, विजय वाडेकर, वैभव नाईक, संतोष सावंत, जितेंद्र गावडे, व इतर उपस्थित होते.
उल्हास देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी डेगवे माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या व प्रतिवर्षी गुणांनु क्रमाने प्रथम येणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना कायम पारीतोषिके देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब तोरस्कर यांच्याकडे देणगी दिली आहे. त्या रक्कमेच्या व्याजातून सदर पारीतोषिके देण्याची विनंती केली आहे.
‘ श्री.उल्हास देसाई.यांच्या ६० वाढदिवसा निमित्ताने डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुरूनाथ देसाई यांनी व संस्थेचे सर्व पदाधिकारी,सभासद यांनी शिवाय ते पूर्वी कार्यरत असलेल्या त्यांच्या वस्तू व सेवा कार्यालयातील विविध संघटना,मित्र,परीवारातील व आप्त स्वकीय परीवारातील बांदा, सावंतवाडी,पत्रकार मित्रानी, विविध राजकीय लोकप्रतिनिधीनी व डेगवे गावातील त्यांच्या चाहत्यांनी प्रत्यक्ष व वाँटसप,फेसबुक, मोबाईलद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या घरी कुंटुबियांच्या सोबत केक कापून औक्षण केले आहे. यामुळे त्यांनी सर्वाचे आभार मानले आहेत.
उल्हास देसाई हे डेगवे गावातील असून त्यांना सामाजिक,शैक्षणिक कार्याची आवड आहे.ते डेगवे-आंबेखणवाडी युवक मंडळ,मुंबई चे एक संस्थापक असून सरचिटणीस पदाची धुरा अद्यापही यशस्वी संभाळीत आहेत.
शिवाय डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य,सहचिटणीस, चिटणीस, या पदावर काम केले असून ते सदर संस्थेच्या गेली २० वर्षे सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. या माध्यमातून गावात व मुंबईत विविध उपक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री गुरूनाथ देसाई व संस्थेच्या आपल्या इतर सहकारी यांच्या मार्फत राबविले आहेत.सदर संस्था संचलित डेगवे गावातील “नंदादीप”वाचनालयाचे ते कार्यवाह पदावर आहेत.सदर वाचनालयास शासन मान्य “अ”वर्ग प्राप्त करून दिला. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे..
अशा सेवाभावी व निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या निवृत्त राज्यकर निरीक्षक श्री.उल्हास देसाई यांना निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य लाभो अशी ,अठ्ठेचाळीस खेड्यांच्या श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी व ग्रामदैवत श्री माऊली चरणीं समस्थ डेगवे ग्रामस्थातर्फे प्रार्थना आहे.त्यांना आतापर्यंत राज्य स्तरीय ग्रंथमित्र,समाज गौरव,समाज प्रबोधन,व स्मार्ट लिडर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रा. किशोर देसाई
चिटणीस, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई
श्री उल्हास देसाई आपला आज वाढदिवस आहे, आयुष्यातला महत्वाचा क्षण तो म्हणजे वाढदिवस, आपण आपल्या गावासाठी व समाजासाठी एक चांगलं उल्लेखनीय कार्य करत आहात, त्या कार्याला व वाढदिवसाला आपणास मनापासून शुभेच्छा व मनापासून शुभ आशीर्वाद,
आपणास आई जगदंबा समाजाचे कार्य करण्यासाठी निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना…।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
——————–
*श्री गुरुनाथ कृष्णा देसाई व परिवार .
***अध्यक्ष, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई .
**सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते,