*जागतिक साकव्य सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांच्या “चला कापडण्याला” ची निवड*
शेवाळा: ता.कळमनुरी
श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालयच्या माध्यमातून मराठी वाड्:मय क्षेत्रामध्ये मानाचा असलेला राज्यस्तरीय श्री चक्रधर स्वामी वाड्:मय दिला जातो.
“श्री चक्रधर स्वामी वाड्:मय पुरस्कार २०२२”या मानाच्या पुरस्कारासाठी १ एप्रिल २०२२ ते ३१मार्च २०२३ या कालावधीतील प्रकाशित झालेली सर्वच वाड्:मय प्रकारातील पुस्तके आमंत्रित करण्यात आली होती.
पण बालसाहित्य तीन चार आल्यामुळे बालसाहित्याची निवड करण्यात आली नाही.
महाराष्ट्रा मधून १२ साहित्यिकांच्या कलाकृतीची या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे श्री चक्रधर स्वामी साहित्य पुरस्कार समितीचे संयोजक/ अध्यक्ष अनिल मनोहर कपाटे शेवाळकर, गोविंद आराध्ये, यशवंत जामोदकर, सागर कपाटे यांनी जाहीर केले आहे. पुरस्कार प्राप्त प्रतिभावंतांमध्ये…..
१) कवितासंग्रह: अंत:स्थ हुंकार (हर्मिस प्रकाशन) शिवाजी ना.शिंदे – सोलापूर
२) कवितासंग्रह : कवितेच्या पारंब्या ( संवेदना प्रकाशन) प्रा.डॉ.यशवंत पाटील -नाशिक
३) कादंबरी : आयास ( स्वरूप प्रकाशन) शंकर विभुते -नांदेड
४) कादंबरी : अनादिसिद्धा ( इंकिंग इनोव्हेशन्स ) भूपाळी निसळ – अहमदनगर
५) कथासंग्रह : वाटणी ( संस्कृती प्रकाशन ) भास्कर बंगाळे – पंढरपूर
६) कथासंग्रह : टो्लधाड ( सप्तर्षी प्रकाशन ) वर्षा किडे – कुळकर्णी – नागपूर
७) ललित: पाय आणि वाटा ( हर्मिस प्रकाशन ) सचिन वसंत पाटील – कर्णाळ ता.मिरज
८) चरित्र: राजकीय मानदंड भाई गणपतराव देशमुख ( सायन पब्लिकेशन) प्रा.डॉ.किसन माने – सांगोला
९) संर्किण: ग्रामीण साहित्य चळवळ: एक ध्यासपर्व ( स्वरूप प्रकाशन ) डॉ.वासुदेव मुलाटे – औरंगाबाद
१०) संर्किण : चला कापडण्याला ( वैशाली प्रकाशन ) प्रा.डॉ. सुमती पवार – धुळे
११) संर्किण: परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन ( अर्थव पब्लिकेशन ) सुरेश साबळे – बुलढाणा
१२) संर्किण: विश्ववाद ( कुसनाळे ) सचिन कुसनाळे – जि.कोल्हापूर.
यांची निवड करण्यात आली आहे.
परिक्षण समिती मध्ये अनिल शेवाळकर,प्रा.रमेश वाघमारे, डॉ.काळे, इंजिनिअर सागर कपाटे, श्री देवानंद मुंढे, वैभव वानखेडे, यशवंत जामोदकर, संतोष वानखेडे, उत्तमराव सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
सदर पुरस्कार २००१ पासून सुरू करण्यात आलेला असून आता पर्यंत १६२ साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र,व ग्रंथ भेट असे असुन लवकरच “श्री चक्रधर स्वामी वाड्:मय पुरस्कार” वितरण सोहळ्यात सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येतील. तारीख निश्चित झाली की सर्वांना कळवण्यात येईल, असे संयोजक व अध्यक्ष यांनी घोषित केले आहे.