*…अन्यथा सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात होऊ दे चर्चा अभियान घेणार- सतीश सावंत*
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विकास कामांच्या निविदा प्रक्रिया राबविताना नवीन अटी शर्ती घालून काही ठराविक ठेकेदारांना कामाचे ठेके मिळवून देत आहेत. कणकवली आणि देवगड मधील वेगवेगळी छोटी छोटी विकास कामे एकत्र करून दोन मोठ्या ठेकेदारांना ती देण्यात आली. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय केला जात आहे. निविदा प्रक्रिया मॅनेज केल्या जात असल्याने निविदेसाठी स्पर्धा होत नाही त्यामुळे शासनाचेही नुकसान होत आहे. ठेकेदारांनी भरलेली टेंडरे मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्याच कारणामुळे एका ठेकेदाराने आत्महत्या करण्याचा इशारा कार्यकारी अभियंत्यांना दिला होता. कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी करत हे प्रकार बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात होऊ दे चर्चा अभियान घेण्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे.
कार्यकारी अभियंत्यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचताना सतीश सावंत पुढे म्हणाले, कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथे नदीच्या कडेला संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी अंदाज पत्रकात ४१ लाख ९९ हजार ३३१ रु रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या कामासाठी ५ ठेकेदारांनी टेंडर भरले होते. त्यातील ४ ठेकेदारांना धमकावून त्यांची टेंडर मागे घेण्यास लावण्यात आली. तर त्यातील एका ठेकेदाराला ४१ लाख ९९ हजार ३३१ रु रक्कमेच्या इस्टिमेंट रेटनेच २४/०७/२०२३ रोजी वर्कऑर्डर देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक इमारतीमधील अस्तित्वातील स्लॅबच्या छतावर प्रिकोटेड पत्रे घालणे या कामासाठी अंदाज पत्रकात ४१ लाख ४७ हजार १८२ रु रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या कामासाठी ८ ठेकेदारांनी टेंडर भरले होते. त्यातील ७ ठेकेदारांना धमकावून त्यांची टेंडर मागे घेण्यास लावण्यात आली. तर त्यातील एका ठेकेदाराला ४१ लाख ४४ हजार ६९४ रु रक्कमेच्या जवळपास इस्टिमेंट रेटनेच २०/०६/२०२३ रोजी वर्कऑर्डर देण्यात आली.
त्याचबरोबर विकासकामामध्ये सुरुवातीला कमी रक्कम दाखवून मर्जीतील ठेकेदाराला कामाचा ठेका मिळाल्यानंतर कामाची रक्कम वाढविली जाते.अंदाजित असलेली रक्कम खर्ची घातली जाते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या दबावाखाली कार्यकारी अभियंता नियमांची पायमल्ली करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. हे प्रकार थांबले नाही तर या सगळ्याचा पंचनामा होऊ दे चर्चा अभियानातून करण्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*